Virat Kohli Century:
Virat Kohli celebrating his magnificent century moments before a fan stormed the field, causing chaos at JSCA Stadium, Ranchi.saam tv

Virat Kohli Century: भरमैदानात गोंधळ उडाला; शतकाच्या सेलिब्रेशनानंतर चाहता विराटकडे थेट धावत सुटला; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Century: रांची येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराट कोहलीने ५२ वे एकदिवसीय शतक झळकावले. शतकाचं सेलिब्रेशन करताना एक चाहता अचानक मैदानात घुसला. याचा व्हिडिओ व्हायरल झालाय.
Published on

भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली दमदार शतक करत अनेक टीकाकारांना सणसणीत उत्तर दिलंय. वनडे क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीवरून त्याच्यावर टीका केली जात होती. या टीकेला विराटने बॅटने प्रत्युत्तर देत सर्वांना गप्प केलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेच्या पहिल्या सामन्यात कोहलीने अप्रतिम शतक ठोकलं. दमदार शतकाचे सेलिब्रेशन करताना मात्र एक अनोखी घटना घडली. एका चाहत्यानं मैदानात घुसखोरी करत विराटकडे धावत सुटला.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या कोहलीसाठी तो दौरा चांगला राहिला नव्हता. पण रांचीमध्ये JSCA स्टेडियमवर मात्र विराट कोहलीने शतक झळकावलं. या मैदानावरील कोहलीचं तिसरं शतक आहे. हे विराट कोहलीच्या कारकिर्दीतील हे ५२ वे एकदिवसीय शतक होते. त्याने एकूण ८३ वे आंतरराष्ट्रीय शतक केली आहेत.

Virat Kohli Century:
Virat Kohli Century: रांचीमध्ये कोहलीची विराट खेळी; ठोकलं ५२ वे शतक, मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम

यासह त्याने सचिन तेंडुलकरचा क्रिकेटच्या सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडला. विराट कोहलीने १०२ चेंडूत चौकार मारत शतक पूर्ण केले. या डावाच्या सुरुवातीपासूनच तो आक्रमक खेळला. विराटने ७ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने आपलं ५२ शतक पूर्ण केलं. या वर्षीचे हे त्याचे दुसरे शतक आहे. यापूर्वी त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक झळकावले होतं.

Virat Kohli Century:
Ind vs Sa: रोहित आणि विराटने अर्धशतकानंतर केलं सारखंच सेलिब्रेशन; दोघांच्याही सेलिब्रेशनचा रोख नेमका कोणाकडे?

दरम्यान शतकाच्या सेलिब्रेशनवेळी एक चाहता मैदानात घुसला आणि विराटकडे धावत सुटला. विराट कोहलीने जॅन्सनचा चेंडू थर्डमनकडे खेळत शतक पूर्ण केलं. त्यानंतर हेल्मेट काढून गळ्यातील अंगठीला किस करत सेलिब्रेशन करत होता. त्यावेळी अचानक एक चाहता सुरक्षा भेदून थेट मैदानात घुसला. क्षणात धावत आलेला व्यक्ती कोहलीच्या पायाशी नतमस्तक झाला. संपूर्ण घटना इतक्या वेगाने घडली की सुरक्षा रक्षक काही क्षणांसाठी अवाक् झाले. मात्र त्यांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत चाहत्याला मैदानाबाहेर नेलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com