Team India: विराट-रोहितला मिळणार 'फुल इज्जत', गंभीर-आगरकरचा BCCI घेणार क्लास, बोलवली तातडीची बैठक

Bcci urgent meeting virat rohit: भारत विरुद्ध प्रतिस्पर्धी संघाच्या दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ने तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत माजी खेळाडू गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर उपस्थित होते.
team india coaching staff
team india coaching staffsaam tv
Published On

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बुधवारी रायपूरमध्ये पुरुष टीम मॅनेजमेंटसोबत एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीचा उद्देश सर्व फॉर्मेट्समध्ये रोडमॅप पुन्हा ठरवणं आणि निवड प्रक्रियेत दिसणाऱ्या त्रुटींना दूर करणं असा असणार आहे. ही बैठक सामन्याच्या दिवशी, भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी होणार आहे.

Sportsar च्या अहवालानुसार, या चर्चेत बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया, संयुक्त सचिव प्रभतेज सिंह भाटिया, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर सहभागी होण्याची शक्यता आहे. बीसीसीआय अध्यक्ष मिथुन मनहास या बैठकीसाठी उपस्थित असतील की नाही हे अजून स्पष्ट नाही. ही बैठक दुसऱ्या वनडे सामन्याच्या दिवशी असल्याने वरिष्ठ खेळाडूंना बोलावलं जाण्याची शक्यता कमी मानली जातेय.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बैठकीचा उद्देश स्पष्ट करताना म्हटलंय की, सिलेक्टर्स आणि टीम मॅनेजमेंट यांच्यात समन्वय साधणं, निवड प्रक्रियेत सातत्य राखणं, खेळाडूंच्या वैयक्तिक विकासासाठी मार्ग आखणं हे उद्देश आहेत.

team india coaching staff
Virat Kohli: विराट पुन्हा टेस्टमध्ये कमबॅक करणार? सेंच्युरीनंतर किंग कोहलीने दिलं अखेर उत्तर

त्या अधिकाऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे, नुकतंच टेस्ट सिरीजमधील झालेल्या पराभवामुळे बोर्डाची चिंता वाढली आहे. त्यामुळे आम्हाला आगामी गोष्टींबाबत स्पष्टता आणि नियोजन हवंय. विशेषतः पुढील टेस्ट सिरीज आठ महिन्यांवर आली आहे.

वनडे आणि टी-२० क्रिकेटबाबतही चर्चा

ही चर्चा फक्त टेस्ट क्रिकेटपुरती मर्यादित नाहीये. त्या अधिकाऱ्याने सांगितलं की, “भारत पुढच्या वर्षी टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार असणार आहे. त्यानंतरच्या वनडे वर्ल्ड कपसाठीही भारत मजबूत स्पर्धक असेल. त्यामुळे या मुद्द्यांवर लवकर तोडगा निघेल अशी आमची इच्छा आहे.”

team india coaching staff
Rohit Sharma: कोहलीच्या शतकानंतर रोहितची भन्नाट रिअ‍ॅक्शन; आनंदाच्या भरात केलं असं की...! Video झाला व्हायरल

जरी अधिकृतपणे कोणत्याही खेळाडूंची नावं घेतली गेली नसली तरी अहवालानुसार, सध्याची मॅनेजमेंट आणि वरिष्ठ खेळाडू विराट कोहली व रोहित शर्मा यांच्यात संवाद कमी झाल्याचं दिसून येतंय. या दोघांनी गेल्या वर्षी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आणि 2025 च्या सुरुवातीला टेस्ट क्रिकेटपासूनही दूर झाले. त्यानंतर नवीन मॅनेजमेंटशी त्यांचा संवाद कमी होत चालल्याच्या चर्चा सतत वाढतायत.

एकूणच रायपूरमधील या बैठकीकडे ताळमेळ साधण्याचा प्रयत्न म्हणून पाहिलं जातंय. पण confusing Test strategies, आगामी आयसीसी स्पर्धा आणि दोन महान भारतीय खेळाडूंशी नातेसंबंध थंडावल्याची जाणीव यामुळे ही बैठक ड्रेसिंग रूम आणि निवड प्रक्रियेपलीकडेही बारकाईने पाहिली जाणार आहे.

team india coaching staff
Ind vs Sa: रोहित आणि विराटने अर्धशतकानंतर केलं सारखंच सेलिब्रेशन; दोघांच्याही सेलिब्रेशनचा रोख नेमका कोणाकडे?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com