इस्रायल आणि इराणमधील युद्ध आता अधिक भीषण वळणावर पोहोचलंय. सौदी अरेबियातील जगातील सर्वात मोठ्या तेल रिफायनरी 'अराम्को' कंपनीवर ड्रोन हल्ला कऱण्यात आलाय. अराम्को सौदी अरेबिया सरकारच्या मालकीची खनिज तेल कंपनी आहे. . हल्ल्यानंतर अराम्कोनं रास तनुरा येथील तेल शुद्धीकरण बंद केलं. त्यामुळे बेंट क्रूड तेलाच्या किमती १३.५ टक्क्यांनी वाढल्या. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावामुळे जागतिक तेल पुरवठा धोक्यात आलाय. त्यामुळे भारताची चिंता वाढलीय. कारण भारताकडे सध्या 10 दिवसांचाच कच्च्या तेलाचा साठा शिल्लक आहे.. सौदी, इराक आणि कुवेतमधून होणारी 50 टक्के तेल आयात या युद्धजन्य परिस्थितीमुळे विस्कळीत होण्याची भीती आहे.
शैलेंद्र देवळाणकर, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक
याचा थेट परिणाम कुठल्या क्षेत्रावर होऊ शकतो ते पाहूया...
1) पेट्रोल-डिझेलचा भडका
सध्या ब्रेंट क्रूड 75 डॉलर प्रतिबॅरलच्या आसपास आहे. मात्र, युद्ध लांबल्यास हे दर 120 ते 130 डॉलरपर्यंत जाऊ शकतात. यामुळे सध्या 95 ते 105 रुपयांच्या दरम्यान असलेले पेट्रोलचे दर 120 ते 135 रुपये प्रतिलिटर होण्याची शक्यता आहे.
2) रुपयाची ऐतिहासिक घसरण
कच्च्या तेलाच्या किमतीत प्रत्येक 1 डॉलरची वाढ झाली तर रुपया कमजोर होऊन प्रति डॉलर 96 ते 98 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
3) महागाईचा दर 7.5 टक्क्यांवर?
मालवाहतुकीचा खर्च 10-15 टक्क्यांनी वाढेल. याचा थेट परिणाम भाजीपाला, अन्नधान्य आणि दैनंदिन वस्तूंच्या किमतींवर होऊन महागाईचा दर 7.5 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो.
4) गृहकर्जाचे हप्ते वाढणार
वाढत्या महागाईला रोखण्यासाठी RBI व्याजदर वाढवू शकते. यामुळे नवीन आणि जुन्या गृहकर्जाचे तसेच वाहनकर्जाचे हप्ते महाग होण्याची भीती आहे.
दरम्यान, सौदी अरेबिया प्रशासनाने मात्र अराम्कोवर हल्ला झाल्याचं वृत्त फेटाळलं आहे. जगातील जवळपास 25 ते 30 देशांना या कंपनीकडून तेल पुरवठा होतो. यामध्ये चीन, जपान, दक्षिण कोरिया, भारत, अमेरिका या प्रमुख देशांचा समावेश आहे. भारत दिवसाला 1.1 मिलियन बॅरल्स खनिज तेल अराम्कोकडून खरेदी करतो. तर जपान त्यांच्या गरजेच्या 40 टक्के तेल खरेदी अराम्कोकडून करतो. यासोबत अनेक देश अराम्कोकडून तेल खरेदी करत असल्यानं जागतिक अर्थव्यवस्थेवर याचे गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जातेय. मध्य-पूर्व आशियामधील युद्धामुळे तटस्थ असलेल्या देशही महागाईंच्या ज्वाळांची होरपळून निघणार हे निश्चित.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.