AUS vs ENG saam tv
Sports

AUS vs ENG: सिडनीच्या मैदानावर मोठा राडा; लाईव्ह सामन्यात भिडले लाबुशेन-स्टोक्स, पाहा Video

Marnus Labuschagne And Ben Stokes: अॅशेस सिरीजमधील पाचव्या टेस्ट सामन्यात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेन यांच्यात मोठा वाद झाला.

Surabhi Jayashree Jagdish

ऑस्ट्रेलिया विरूद्ध इंग्लंड यांच्यामध्ये एशेज सिरीजमधील शेवटचा टेस्ट सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळण्यात येतो. आज या सामन्याचा दुसरा दिवस होता. दरम्यान या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्ट्रोक्स आणि ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मार्नस लाबुशेन यांच्यामध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. यावेळी हा वाद इतका वाढला की, मैदानातील अंपायर्सना तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा लागला.

इंग्लंडच्या टीमने ही एशेज सिरीज गमवाली आहे. या सिरीजमधील पहिले तिन्ही सामने ऑस्ट्रेलियाने जिंकून सिरीजही जिंकलीने. त्यानंतर चौथ्या टेस्टमध्ये मात्र इंग्लंडच्या टीमने विजय मिळवला. अशातच आता इंग्लंड दौऱ्याचा शेवट विजयाने करण्याचा प्रयत्न करणार आहे.

लाबुशेन आणि स्टोक्सनमध्ये जोरदार राडा

दरम्यान या दोन्ही खेळाडूंध्ये ट्रेविस हेडमुळे वाद सुरु झाला. स्टोक्स २९ वी ओव्हर टाकण्यासाठी आला आणि शेवटच्या बॉलवर हेडने लेग साईडला फोर लगावला. स्टोक्सला हे आवडलं नाही आणि रागाच्या भरात तो हेडला काही म्हणाला. यावेळी हेड देखील थांबला नाही आणि त्याने स्टोक्सला प्रत्युत्तर दिलं.

त्यानंतर स्टोक्स अंपायरकडे गेला आणि त्याची कॅप घेतली. तिथे लाबुशेनने त्याला काहीतरी सांगितलं, ज्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. हा वाद वाढला आणि स्टोक्सने लाबुशेनच्या खांद्यावर हात ठेवत लाबुशेनला काहीतरी सांगितलं. यावेळी दोन्ही खेळाडू स्पष्टपणे संतापले असल्याचं दिसून आलं.

दरम्यान, या दोघांच्या भांडणामध्ये हेड आला आणि त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र अंपायरने दोघांना बाजूला केलं. त्यानंतर दोन्ही खेळाडू आपापल्या मार्गाने निघून गेले.

इंग्लंडने दुसऱ्या दिवसाची सुरुवात तीन बाद २११ रन्सवर केली. पहिल्या दिवशी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही. इंग्लंडकडून जो रूटने शानदार शतक झळकावलं. रूटने २४२ बॉल्समध्ये १५ चौकारांसह १६० रन्स केले. हॅरी ब्रुकनेही ९७ चेंडूत सहा चौकार आणि एका षटकारासह ८४ रन्स केले. इंग्लंडने त्यांच्या पहिल्या डावात ३८४ रन्स केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण; VIDEO समोर

BMC Election 2026: मुंबई निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? किती आहे एकूण मालमत्ता?

Accident : उज्जैनला जाताना काळाचा घाला, ३ जणांचा जागेवरच मृत्यू, जळगावात घाटात गाडीवर नियंत्रण सुटले अन्...

2026 मध्ये WhatsApp चॅटिंगचा अंदाज बदलणार; जे लिहू त्याचा Sticker बनेल, आताच जाणून घ्या 3 स्मार्ट फीचर्स

मुदत संपली,आता HSRP नंबरप्लेट बसवता येणार का? खर्च किती होणार? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT