Virat Kohli Video
Virat Kohli Video Saam tv
क्रीडा | T20 WC

Virat Kohli Video: स्टार्कचा उसळता चेंडू विराटच्या हेल्मेटवर आदळला; एका क्षणासाठी चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकला, पाहा व्हिडिओ

Vishal Gangurde

India vs Australia Match:

विश्वचषकात आज चेन्नईचील चेपॉक मैदानावर भारताची लढाई ऑस्ट्रेलियाशी सुरु आहे. या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी दमदार खेळ दाखवत टीम ऑस्ट्रेलियाची कंबर तोडली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ १९९ धावांवर गारद झाला. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाचीही सुरुवातीला दमछाक पाहायला मिळाली. मात्र, त्यानंतर विराट आणि केएल राहुलने डाव सावरला. चेन्नईतील मैदानावर सुरु असलेल्या सामन्यात विराट कोहली खेळत असताना चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. (Latest Marathi News)

आज रविवारी सुरु असलेल्या सामन्या टीम इंडियाचे गोलंदाजांनी कमाल खेळ दाखवला. मात्र, ऑस्ट्रेलियाचेह गोलंदाज देखील जोमात असल्याचं पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनीही टीम इंडियाच्या फलंदाजांना जेरीस आणल्याचं दिसून आलं.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ऑस्ट्रेलियाची तगडी टीम इंडियाच्या गोलंदाजांपुढे ढेर झाली. रविंद्र जडेजाने तीन गडी बाद केले. कुलदीप यादवने दोन गडी बाद केले. इतर गोलंदाजांनी प्रत्येकी एक-एक गडी बाद केले.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. टीम इंडियाचे तीन फलंदाज दोन धावांवर बाद झाले.

विराटच्या एका शॉटवर चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकला

तेत्तीसावं षटक स्टार्क टाकत होता. स्टार्कने षटकाचा तिसरा चेंडू बाऊन्सर टाकला. त्या चेंडूचा सामना करताना विराटचा अंदाज चुकला. त्यानंतर चेंडू थेट विराटच्या हेल्मेटला लागला. चेंडू विराटच्या हेल्मेटला लागल्याने मैदानात एकच शांतता पसरली.

मिचेल स्टार्क देखील विराटकडे धावत आला. मात्र, विराटला हेल्मेटमुळे काहीच झाले नाही. स्टार्कचा चेंडू लागल्यानंतर विराटच्या चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paris Olympics Opening Ceremony Live : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 'छा गया इंडिया': नेशन ऑफ परेड्समध्ये पीव्ही सिंधू, शरथ कमल यांनी केलं भारताचं नेतृत्व

Paris Olympics Opening Ceremony Live : सीन नदीच्या तिरावर लेडी गागाचा परफॉर्मन्स, हजारो चाहत्यांची उपस्थिती; जाणून घ्या पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्याची खास वैशिष्ट्ये

Saturday Horoscope: 27 जुलैला या 7 राशींवर होणार शनिदेवाची कृपा, मनातील सगळ्या इच्छा होणार पूर्ण

Apple लव्हर्ससाठी आनंदाची बातमी! कंपनीने iPhone च्या Pro मॉडेलच्या किंमतीत पहिल्यांदाच केली मोठी कपात

Sick leave Policy Viral: सीक लिव्हसाठी 7 दिवस आधी कळवावं लागेल; सुट्टीच्या मेसेजवर बॉसचं उत्तर चक्रावणारं, चॅटिंग व्हायरल

SCROLL FOR NEXT