क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाचा खेळाडू करतोय मजूरी Twitter/@ANI
Sports

क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाचा खेळाडू करतोय मजूरी

नुकतीच टोक्यो ऑलिम्पिक (Tokyo Olympic Games 2020) स्पर्धा पार पडली. भारताने विविध खेळात 7 पदकं पटकावली.

वृत्तसंस्था

गुजरात: नुकतीच टोक्यो ऑलिम्पिक (Tokyo Olympic Games 2020) स्पर्धा पार पडली. भारताने विविध खेळात 7 पदकं पटकावली. पदक विजेत्या भारतीय खेळाडूंवर सरकार, विविध संस्था पैशांचा पाऊस पाडत आहे. या सर्व खेळाडूंनी देशाचा सन्मान वाढवल्याने त्यांच्यावर अशाप्रकारे कौतुकाचा आणि बक्षीसांचा वर्षाव होत आहे.

पण आपल्या देशात असेही कित्येक खेळाडू आहेत, ज्यांनी राष्‍ट्रीय, आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर भारताची मान अभिमानाने उंचावली. पण पुढे जाऊन सरकार, आणि संपुर्ण समाजालाच त्याचा विसर पडल्याने त्यांच्यावर हलाखीची परिस्थिती ओढावली. असे खेळाडू मेहनत कष्ट आणि मोल मजूरी करुन अगदी हालाकिचे जीवन जगत आहेत. अशीच एक दुख:द कथा आहे भारताला विश्वचषक जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या क्रिकेटपटूची जो सध्या मोल मजदूरी करुन आपला उदरनिर्वाह करत आहे.

तर ही गोष्ट आहे 2018 सालच्या अंध खेळाडूंच्या क्रिकेट विश्वचषकाची (2018 Blind Cricket World Cup) यावेळी भारतीय संघातील प्लेईंग-११ चा महत्वाचा खेळाडू होता नरेश तुमदा (Naresh Tumda). गुजरातच्या नवसारी (Gujarat Navsari) मधील नरेश तुमदा विश्वचषक जिंकणाऱ्या संघातील महत्वाचा खेळाडू होता. दुबईतील शारजाह येथील मैदानावर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात त्याने पाकिस्तानी ठेवलेल्या 308 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत भारताला विश्वचषक जिंकवून दिला होता.

नरेश सध्या मोल मजूरी करुन स्वत:सह कुटुंबाचं पोट भरत आहे. भारताला अंध व्यक्तींचा क्रिकेट विश्वचषक जिंकवून देणारा नरेश आज पोटाची खळगी भरण्यासाठी नवसारीत 250 रुपये रोंजदारीवर काम करत आहे. यावर बोलताना नरेश म्हणाला, “मी प्रतिदिवस 250 रुपये कमवतो. मी आतापर्यंत तीन वेळा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना मदतीसाठी हाक दिली आहे. मला एखादी सरकारी नोकरी मिळेल का? अशी विनंती देखील केली आहे. पण अजूनपर्यंत मला कोणतंच सकारात्मक उत्तर आलेलं नाही”.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT