ऑफर! 'नीरज' नावाच्या व्यक्तीला मिळणार मोफत पेट्रोल तर फ्री रोप-वे राईड

नावात काय आहे, असे शेक्सपिअर म्हणून गेला. पण आता नावातच सर्व काही आहे याचा प्रत्यय गुजरातमध्ये आला आहे.
ऑफर! 'नीरज' नावाच्या व्यक्तीला मिळणार मोफत पेट्रोल तर फ्री रोप-वे राईड
ऑफर! 'नीरज' नावाच्या व्यक्तीला मिळणार मोफत पेट्रोल तर फ्री रोप-वे राईडTwitter
Published On

गुजरात: नावात काय आहे, असे शेक्सपिअर म्हणून गेला. पण आता नावातच सर्व काही आहे याचा प्रत्यय गुजरातमध्ये आला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) भारतासाठी सुवर्णपदक (Gold Medalist) जिंकून इतिहास रचला. परंतू आता त्याच्या या प्रराक्रमामुळे नीरज नावाच्या लोकांना लाभ मिळणार आहे. गुजरातच्या भरूच (Gujrat- Bharuch) जिल्ह्यातील नेत्रंग शहराच्या एका पेट्रोल पंपाच्या मालकाने वेगळ्या पद्धतीने ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकल्याचा आनंद साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑफर! 'नीरज' नावाच्या व्यक्तीला मिळणार मोफत पेट्रोल तर फ्री रोप-वे राईड
स्टीव्ह स्मिथला वाटते 'बुमराहची' भिती! त्यानेच सांगितले 4 घातक गोलंदाज

रविवारी या पेट्रोल पंपच्या मालकाने त्याच्या पंपावर एक फलक लावला. नीरज नावाच्या प्रत्येक व्यक्तीला सोमवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५०१ रुपयांचे पेट्रोल मोफत देण्यात येईल, असे लिहिण्यात आले आहे. एसपी पेट्रोलियमच्या मालकाने सांगितले, नीरज चोप्राच्या विजयाच्या सन्मानार्थ ही खास ऑफर ठेवण्यात आली आहे. नीरज नावाच्या प्रत्येक व्यक्तीला आपले ओळखपत्र दाखवून मोफत पेट्रोल देण्यात येणार आहे. एवढेच नव्हे, तर मालकाने त्याच्या पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नीरज नावाच्या व्यक्तींचे मनापासून स्वागत करण्याचे सांगितले आहे.

नीरज नावाच्या लोकांना भरूचमध्ये मोफत पेट्रोल मिळत आहेच त्याचबरोबर जुनागढमध्येही ऑलिम्पियंन्सच्या सन्मानार्थ अशीच ऑफर देण्यात आली आहे. या अंतर्गत नीरज नावाच्या लोकांना गिरनार रोपवे-वर मोफत फिरायची संधी मिळणार आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राच्या भावनेला सलाम करण्याच्या उद्देशाने कंपनीने ही खास ऑफर दिली आहे. ही ऑफर २० ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com