ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) सध्याच्या काळातला सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. कसोटी क्रिक्रटमध्ये () मोठी धावसंख्या उभारण्या बरोबरच तो टी-20 क्रिकेटमध्येही धमाकेदार फलंदाजी करत असतो. कसोटी क्रिक्रेटमध्ये स्मिथने 7 हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. या धावा करत असताना त्याला अनेक घातक गोलंदाजांना सामोरं जावं लागलं असतं. स्मिथ हा चागला फलंदाज असला तरी त्याला काही गोलंदाजांचा सामना करताना कठीण जाते. एका माध्यमाला मुलाखत देताना स्मिथने याबाबत खुलासा केला आहे.
सध्याच्या काळातला सर्वोत्तम गोलंदाज कोण आहे, असा प्रश्न स्मिथला विचारला असता, त्याने 4 गोलंदाजांची नावं घेतली. यामध्ये भारताचा जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), इंग्लंडचा जेम्स अँडरसन (James Anderson), दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा (Kagiso Rabada) आणि ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स यांचा (Pat Cummins) समावेश आहे. सध्या हे 4 गोलंदाज जागतिक क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीवर फलंदाजांना नाचवत. स्मिथने नावं घेतलेले चारही गोलंदाज जलदगती गोलंदाज आहेत.
स्मिथने नाव घेतलेल्या खेळाडूंमध्ये जेम्स अँडरसन सर्वाधिक वय असलेला खेळाडू आहे. अँडरसनचे वय सध्या 39 वर्ष आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या इनिंगमध्ये अँडरसनने 4 बळी घेतले. या इनिंगमध्ये अँडरसनने अनिल कुंबळेच्या 619 कसोटी बळींचा विक्रमही मोडीत काढला आहे. कसोटी क्रिक्रेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता अंडरसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसंच कसोटीमध्ये सर्वाधिक बळी घेणारा वेगवान गोलंदाज अँडरसन आहे. जसप्रीत बुमराहने मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये 5 आणि पहिल्या इनिंगमध्ये 4 विकेट घेतल्या होत्या.
सध्या स्टीव्ह स्मिथच्या कोपराला दुखापत झाली आहे. दुखापतीमुळे तो क्रिकेटपासून लांब आहे. आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये तो अखेरचा सामना खेळला आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) स्मिथ खेळत आहे. आयपीएल दरम्यान स्मिथची दुखापत आणखी वाढली, परिणामी त्याला शस्त्रक्रिया करावी लागली. या कारणामुळे स्मिथला वेस्ट इंडिज आणि बांगलादेश दौऱ्यासाठी मुकावे लागले होते.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.