champions trophy twitter
Sports

Champions Trophy: विराट आऊट, आता टीम इंडिया हरणार..आठवीतल्या तरुणीने धसका घेतला अन् हृदयविकाराच्या धक्क्याने जीव गमावला

ICC Champions Trophy: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाने विजयाची नोंद केली. पण या सामन्यात विराट कोहली आऊट होताच तरुणीने जीव गमावल्याची घटना समोर आली आहे

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमममध्ये पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडवर ४ गडी राखून विजयाची नोंद केली. या सामन्यात रोहित चमकला, पण विराटला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नव्हती.

विराट स्वस्तात माघारी परतला, हा धक्का आठवीत शिकणाऱ्या तरुणीला सहण झाला नाही, दरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने या तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. ही धक्कादायक घटना देओरीयामध्ये घडली आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, ही तरुणी भारत - न्यूझीलंड यांच्यातील फायनलचा सामना पाहत होती. त्यावेळी विराट कोहली आऊट होताच तिला वाटलं की आता टीम इंडिया हरणार, या गोष्टीचा तिला जबर धक्का बसला. हृदयविकाराचा धक्का आल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

नेमकं काय घडलं?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील फायनलचा सामना ९ मार्चला पार पडला. हा सामना पाहण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्य एकवटले होते. प्रियांशी देखील सामना पाहत होती. तिला वाटलं होतं की, भारतीय फलंदाज चांगला खेळ करणार. जेव्हा भारताचा पहिला फलंदाज माघारी परतला. त्यावेळी विराट कोहली फलंदाजीला आला. तिला वाटलं होतं की, विराट या सामन्यात चांगली खेळी करेल. मात्र विराट १ धाव करत माघारी परतला.

प्रियांशी सोफ्यावर बसून हा सामना पाहत होती. विराट बाद होताच ती सोफ्यावरुन खाली पडली. खाली पडताच कुटुंबातील सदस्यांना धक्का बसला. त्यांनी प्रियांशीला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. मात्र तिच्या कुटुंबियांनी हे नाकारलं आहे. कुटुंबियांच्या मते, विराटचा बाद होण्याचा आणि तिचा मृत्यू होण्याचा काहीही संबंध नाही. मात्र ही बातमी प्रसारमाध्यमात आता वेगाने व्हायरल होऊ लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT