Malavya Rajyoga  Saam Tv
आध्यात्मिक

Surya Ketu Sanyog Rashifal: सावधान! येत्या काही दिवसांत ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात येणार भूकंप

Surya Ketu Sanyog Rashifal: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, केतू हा एक अशुभ ग्रह आहे, जो कोणत्याही ग्रहासोबत एकत्र आल्यानंतर लोकांना मिळणाऱ्या लाभावर वाईट प्रभाव टाकत असतो. १६ ऑगस्ट २०२४ पासून सूर्य केतूच्या मालकीच्या मघा नक्षत्रात प्रवेश करत आहे, याचा ५ राशींवर नकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

Bharat Jadhav

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा सूर्य बलवान असतो तेव्हा व्यक्तीचा आत्मविश्वास आणि नेतृत्व क्षमता वाढते. तो जीवनात उच्च ध्येये साध्य करण्यास सक्षम होत असतो. परंतु सूर्याच्या दूषिततेमुळे माणसामध्ये गर्व, दिखाऊपणा यांसारखे दुर्गुण वाढू लागतात. वडील आणि मुलांमध्ये तणाव वाढू शकतो. तर केतू हा असा ग्रह आहे, ज्याचा सूर्याशी संयोग होऊन अनेक प्रकारचे मानसिक आणि शारीरिक रोग होत असतात.

शुक्रवारी १६ ऑगस्ट २०२४ रोजी ग्रहांचा राजा सूर्य देव केतूच्या मालकीच्या मघा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्रात सूर्याचे संक्रमण सर्व राशींवर परिणाम करेल, परंतु 5 राशीच्या लोकांवर याचा खूप नकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

मेष

सूर्य-केतू संयोगाचा मेष राशीच्या लोकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. उत्पन्न आणि खर्चावर सर्वाधिक परिणाम होईल. तुमच्या उत्पन्नात अनपेक्षित घट होऊ शकते. तसेच उत्पन्नाचे स्रोतही बंद होऊ शकतात. या काळात व्यावसायिकांना मोठी रक्कम मिळू शकते. कुटुंबातील संबंध बिघडू शकतात.

मिथून राशी

मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्य-केतू संयोग नकारात्मक ठरू शकतो. उत्पन्न, व्यवसाय आणि करिअरवर जास्त परिणाम होण्याची शक्यता आहे. निर्णयात चूक झाल्यामुळे खर्चात वाढ होऊ शकते. व्यवसायात आर्थिक नुकसान वाढण्याची शक्यता आहे, अशा काही कारणांमुळे तणाव वाढू शकतो. उच्च रक्तदाबाची समस्या त्रासदायक ठरू शकते.

सिंह

सिंह राशीच्या लोकांनी या काळात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करणे टाळावे. सूर्य-केतू संयोगाच्या प्रभावामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. चुकूनही लॉटरी खरेदी करू नका, तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा वाईट होऊ शकते. निष्काळजीपणाच्या आरोपाखाली नोकरदारांना नोकरीतून काढून टाकले जाऊ शकते. तब्येतची समस्या उद्भवू शकते.

तूळ

सूर्य-केतू संयोगाचा प्रभाव तूळ राशीच्या लोकांसाठीही प्रतिकूल असण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे वाढू शकतात. आर्थिक संकटासह आरोग्याशी संबंधित समस्या उद्दिष्ट पूर्ण होऊ देणार नाहीत. नोकरदार लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी वाढत्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता असून विरोधकांचे वर्चस्व राहील.

धनु

या राशीच्या जातकांची आर्थिक स्थिती कमकुवत राहण्याची शक्यता. उत्पन्नाच्या मुख्य स्त्रोतावर परिणाम होईल. व्यवसाय विस्ताराच्या योजनांवर जास्त खर्च केल्याने आर्थिक संकट वाढेल. नोकरदार लोक त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ न मिळाल्याने तणावात राहतील. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल. कुटुंबात मतभेद होऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT