Amrit Vrishti Yojana: फक्त ४४४ दिवस गुंतवणूक करा अन् मिळवा भरघोस व्याज; SBI ची अमृत वृष्टी योजना नक्की काय आहे?

SBI Amrit Vrishti Yojana: स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांनी नवीन योजना राबवली आहे. या योजनेचं नाव अमृत वृष्टी योजना आहे. या योजनेत तुम्हाला फक्त ४४४ दिवस गुंतवणूक करायची आहे. या योजनेत तुम्हाला भरघोस व्याज मिळणार आहे.
Amrit Vrishti Yojana
Amrit Vrishti YojanaGoogle
Published on
Amrit Vrishti Yojana
Amrit Vrishti YojanaGoogle

प्रत्येकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावे यासाठी गुंतवणूक करत असतात. स्टेट बँक ऑफ इंडियाची अमृत वृष्टि योजना ही नागरिकांना भरघोस व्याज देते.

Amrit Vrishti Yojana
Amrit Vrishti Yojana sbiGoogle

स्टेट बँक ऑफ इंडियाने १५ जुलै रोजी ही योजना सुरु केली होती. या योजनेअंतर्गत नागरिकांना ४४४ दिवस गुंतवणूक करायची आहे. या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त ३ कोटी रुपयांची गुंतवणूक करु शकतात.

Amrit Vrishti Yojana
Amrit Vrishti YojanaGoogle

या गुंतवणूकीवर तुम्हाला वर्षानूवर्षे ७.७५ टक्क्याने व्याज मिळणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना ७.७५ टक्के व्याज मिळणार आहे.

Amrit Vrishti Yojana
Amrit Vrishti YojanaGoogle

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या एफडीवर तुम्हाला लोनदेखील मिळू शकते. ही योजना भारतीय नागरिक आणि NRI सदस्यांसाठीदेखील आहे.

Amrit Vrishti Yojana
Amrit Vrishti YojanaGoogle

स्टेट बँकेच्या या योजनेत आतापर्यंतच्या सर्व एफडीपेक्षा जास्त व्याजदर दिले जात आहे. त्यामुळे या योजनेत तुम्ही एकदा पैसे गुंतवले तर तुम्हाला जास्त फायदा होणार आहे.

Amrit Vrishti Yojana
Amrit Vrishti YojanaGoogle

स्टेट बँकेच्या या योजनेत आतापर्यंतच्या सर्व एफडीपेक्षा जास्त व्याजदर दिले जात आहे. त्यामुळे या योजनेत तुम्ही एकदा पैसे गुंतवले तर तुम्हाला जास्त फायदा होणार आहे.

Amrit Vrishti Yojana
Amrit Vrishti YojanaGoogle

अमृत वृष्टि योजनेअंतर्गत अकाउंट तुम्ही स्टेट बँकेच्या ब्रँचमध्ये जाऊन अकाउंट उघडू शकतात. किंवा घरबसल्या YONO अॅपवरुन अकाउंट उघडू शकतात. अधिक माहितीसाठी बँकेच्या वेबसाइटला भेट द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com