PM Mudra Loan: तरुणांनो, व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देतंय 20 लाखांपर्यंतचे कर्ज, लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज

PM Mudra Loan Scheme: सरकार नेहमीच नागरिकांसाठी नवनवीन योजना राबवत असतात. सरकारची पीएम मुद्रा लोन ही योजना नवीन बिझनेस सुरु करण्यासाठी लोन उपलब्ध करुन देते.
PM Mudra Loan Scheme
PM Mudra Loan SchemeSaam Tv
Published On

सरकार नेहमीच नागरिकांसाठी नवनवीन योजना राबवत असते. देशातील नागरिकांना आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने अनेक योजना राबवल्या जातात.यातीलच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री मुद्रा योजना. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत सरकार स्वतः चा बिझनेस सुरु करण्यासाठी तरुणांना कर्ज देते.

ज्या तरुणांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा आहे. त्या तरुणांसाठी ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेत तरुणांना १० लाख रुपयांचे कर्ज मिळते. परंतु आता कर्जाची मर्यादा वाढवून २० लाख रुपये करण्यात आली आहे. मात्र, यासाठी सरकारने एक अट ठेवली आहे.

PM Mudra Loan Scheme
Lakhpati Didi Scheme: महिलांना व्यवसायासाठी मिळणार 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; लखपती दीदी योजना नक्की आहे तरी काय?

तरुणांना स्वतः चा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करावी, हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योदनेअंतर्गत सरकारद्वारे तरुणांना ५०,००० ते १ लाख रुपयांचे लोन दिले जाते. आता ही मर्यादा वाढवण्यात आली आहे. या योजनेत आता तुम्हाला २० लाख रुपयांचे लोनदेखील मिळू शकते. परंतु यासाठी ज्या तरुणांनी आधी लोन घेतले आहे आणि पूर्णपणे फेडले आहे त्यांनाच पुन्हा २० लाख रुपयांचे लोन मिळू शकते. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पात ही घोषणा केली होती.

सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फी भरावी लागत नाही. तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन या योजनेसाठी अर्ज करु शकतात. या योजनेत तुम्हाला कर्जावर १० ते १२ टक्के व्याज द्यावे लागते.

PM Mudra Loan Scheme
Petrol Diesel Rate:आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमती किती? वाचा एका क्लिकवर

पात्रता

या योजनेसाठी अर्ज करणारा व्यक्ती हा मूळचा भारतीय रहिवासी असणे गरजेचे आहे.

या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय १८ किंवा त्यापेक्षा जास्त असावे.

ज्या व्यक्तींना बँकेद्वारे डिफॉल्टर घोषित करण्यात आले आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.

या योजनेसाठी अर्ज करताना आधार कार्ड, वोटर आयडी, रेशन कार्ड, पॅन कार्ड, जात प्रमाणपत्र, व्यवसाय संबंधित सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.

PM Mudra Loan Scheme
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची खास योजना! दोन वर्षात महिला होणार लखपती; कसं?जाणून घ्या सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com