

नंदुरबार जिल्ह्यात हत्याकांडाची भयंकर घटना घडली. सासरा आणि मेहुण्याने मिळून जावयाची कुऱ्हाड आणि चाकूने वार करून निर्घृण हत्या केली. १० वर्षांपूर्वी झालेल्या घटस्फोटाचा वाद पुन्हा उफाळून आल्याने ही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. बाजारात मारहाण झाली होती. याचा बदला १० दिवसांनंतर घेण्यात आला. या घनटेमुळे नंदुरबारमध्ये खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील नवापुरामध्ये राहणारा ३८ वर्षीय निलेश सुधाम गावित याची कुऱ्हाड, चाकूचे वार करत हत्या करण्यात आली. मूळचा खांडबारा सेगवा गावात राहणारा निलेश सुधाम गावित हा टेलरचे काम करत होता. १० वर्षांपूर्वी निलेशचा ललितासोबत घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर दोघेही वेगवेगळे राहत होते.
घटस्फोटानंतर काही दिवसांपूर्वी ललिता निलेशला बाजारात दिसली होती. त्यावेळी निलेशने ललिताला मारहाण केली होती. या घटनेमुळे ललिता घाबरली होती. ललिताने ही संपूर्ण घटना आपल्या कुटुंबीयांना सांगितली. तिच्या कुटुंबीयांना ही गोष्ट कळताच त्यांना राग अनावर झाला.
ललिताच्या भावाने आणि वडिलांनी १० दिवसांनंतर निलेशवर हल्ला केला. सासरा रामा आणि मेहुणा विण्या यांनी कुऱ्हाड, चाकूने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात निलेश गंभीर जखमी जाला. त्याला तातडीने उपचारासाठी गुजरातच्या सुरतच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान निलेशचा मृत्यू झाला.
या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. वीसरवाडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून पुढील कारवाई हाती घेतली आहे. हत्याकांडाच्या घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले आहेत. आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. तर १० वर्षांपूर्वीच्या घटस्फोटाचा वाद पुन्हा उफाळून आल्याने निलेशला पाहला जीव गमवावा लागला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.