Mangla Gauri Vrat 2024 
आध्यात्मिक

Mangla Gauri : मंगल दोषाचा त्रास आहे? श्रावणमध्ये करा मंगळा गौरीची पूजा; प्रभाव होईल कमी, समस्या सुटतील फटाफट

Mangla Gauri Vrat 2024: श्रावण महिन्यातील मंगळवारी मंगळा गौरीची पूजा केली जाते. या पूजेमुळे मंगळ दोष निघून जात असतो. विवाहित महिलांसह अविवाहित मुली देखील मंगळा गौरीचं व्रत करत असतात.

Bharat Jadhav

विवाहित महिलांसाठी गौरी देवीचं व्रत खूप खास असतं. या दिवशी विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी उपवास करतात. तर अविवाहित मुलीदेखील गौरी देवीची उपासना करतात. पसंतीचा वर मिळावा यासाठी अविवाहित महिला हे व्रत करत असतात. भगवान शंकराच्या प्राप्तीसाठी माता पार्वतीने मंगळा गौरी व्रत पाळले होते असं म्हटलं जातं. या दिवशी तुम्ही अनेक उपायांनी तुमच्या आयुष्यातील समस्यांवर मात करू शकता.

मंगल दोषापासून सुटका

जर तुमच्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर श्रावण महिन्यातील मंगळवारी मंगळागौरीची पूजा करून या दोषापासून मुक्ती मिळू शकते. या दिवशी तुम्ही सुंदरकांड पाठ करू शकता. तसेच अविवाहित मुलींनी माता गौरीची पूजा केल्याने त्यांना देवीचा आशीर्वाद मिळेल.

विवाह जुळण्याचे मार्ग होतील मोकळे

जर तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडथळे येत असतील तर मंगळा गौरीचे व्रत लाभदायक ठरेल. हे व्रत करून तुम्ही या समस्येपासून मुक्ती मिळवू शकता. यासाठी गौरी व्रताच्या दिवशी वाहत्या पाण्यात मातीचे रिकामे भांडे वाहून द्यावीत. असं केल्याने तुमचे लग्न लवकर होण्याची शक्यता अधिक वाढते.

वैवाहिक जीवन होईल आनंदी

जर तुमच्या वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर मंगळा गौरीचे व्रत ठेवा. देवीची विधीपूर्वक पूजा करा. याशिवाय श्रावणच्या मंगळवारी एखाद्या गरजू व्यक्तीला मध दान करा. असं केल्याने तुमचे वैवाहिक जीवन आनंदाने भरून जाईल. श्रावणात मंगळा गौरीचे व्रत ठेवा आणि ब्राह्मणांना अन्नदान करा. असं केल्याने तुम्हाला भगवान शिव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद मिळेल.

मंगळा गौरी व्रतावेळी करा हे खास उपाय

धार्मिक मान्यतेनुसार मंगळा गौरी व्रताची पूजा केल्यानंतर गरीब आणि गरजूंना लाल मसूर दान करावे. तसेच लाल रंगाचे कपडेही दान करू शकता. यामुळे कुंडलीत मंगळ मजबूत होत असतो, असं मानले जाते. विवाहित महिलांसाठी मंगला गौरी व्रत खूप खास आहे. यावेळी गरजू लोकांना मध दान करा. त्यानंतर महादेवाची पूजा करावी. यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहते. मंगळा गौरी व्रताच्या पूजेदरम्यान 'ओम गौरीशंकराय नमः' मंत्राचा २१ वेळा जप करा. असे केल्याने कुंडलीतील मंगळ दोष दूर होत असतो, असे मानले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अजित पवारांविरोधात मोहोळ यांचा शड्डू; पवारांच्या वर्चस्वाला भाजपकडून सुरुंग?

Sachin Ghaiwal: 'मंत्रिमंडळ की गुंडांची टोळी'; सचिन घायवळच्या शस्त्रपरवान्यावरुन राऊतांचा प्रहार

निवडणूक आयोगाकडे 'ती' ऑडिओ क्लिप देऊ, बदमानी करू; ३० लाखाच्या खंडणीसाठी भाजप महिला नेत्याला धमकीचा फोन

Face Scrub: डेड स्कीन काढण्यासाठी घरीच बनवा 'हे' नैसर्गिक स्क्रब, त्वचा उजळेल

Cancer रुग्णांसाठी मोठी खूशखबर! कॅन्सरशी लढणार 'फ्रेंडली बॅक्टेरिया', कॅन्सरवरील बॅक्टेरियाचे संशोधन सुरु

SCROLL FOR NEXT