आध्यात्मिक

Numerology: 'या' 4 तारखेला जन्मलेले लोक असतात प्रगतीशील; नातं टिकवण्यात असतात एक्सपर्ट

Numerology: अंकशास्त्रानुसार या 4 तारखांना जन्मलेल्या लोकांमध्ये जन्मजात नेतृत्व क्षमता असते. हे लोक इतरांना प्रवृत्त करण्यात आणि मार्गदर्शन करण्यात तज्ञ असतात. चला जाणून घेऊया, कोणत्या मूलांकावर जन्मलेल्या लोकांमध्ये हे विशेष गुण आणि वैशिष्ट्ये असतात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सामान्य माणसाला स्वतःबद्दल जितके माहिती असते त्यापेक्षा अंकशास्त्र तज्ञाला जास्त माहिती असते, असं अंकशास्त्राबद्दल,असं म्हटलं जातं. आज आपण 4 जन्म तारखांच्या मुलांकविषयी जाणून घेणार आहोत. या 4 तारखांना जन्मलेल्या लोकांचा अंकशास्त्रात मूळ क्रमांक 1 मानला जातो. चला जाणून घेऊया, कोणत्या तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक 1 असतो. या मुलांक क्रमांकाचे ग्रह कोण आणि वैशिष्ट्ये आहेत ते जाणून घेऊ?

अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला होतो. त्यांची मूळ संख्या 1 आहे. मूलांक 1 चा शासक ग्रह सूर्य आहे. सूर्य जीवन शक्तीचे प्रतीक मानले जाते. त्यांच्यामध्ये प्रचंड ऊर्जा असते, जी त्यांना सतत सक्रिय ठेवते. त्यामुळे अंकशास्त्रात क्रमांक 1 ला विशेष स्थान आहे.

प्रामाणिक आणि दृढनिश्चयी

या मूलांकाचे लोक खूप प्रामाणिक असतात शिवाय त्यांचा निर्धार पक्का असतो. या लोकांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते. ते इतरांना प्रवृत्त करण्यात आणि मार्गदर्शन करण्यात पटाईत असतात. त्यामुळेच ते अनेकदा संस्थांमध्ये उच्च पदावर पोहोचतात. तसेच मूलांक क्रमांक 1 असलेले लोक खूप स्वाभिमानी आणि महत्वाकांक्षी असतात. लोकांना स्वतःवर खूप विश्वास असतो. त्यांना त्यांच्या क्षमतेचा अभिमान असतो शिवाय त्यांच्याकडे नेतृत्व क्षमता देखील चांगली असते.

त्यांनाही त्यांच्या आयुष्यात खूप मान-सन्मान मिळत असतो. मूलांक क्रमांक 1 असलेल्या लोकांचे करिअरही चांगले असतं. उच्च शिक्षणात त्यांना यश मिळत असतं. या मूलांकाचे लोक अनेकदा वरिष्ठ अधिकारी बनतात. या मूलांकाचे लोक अनेकदा उच्च पदावर पोहोचतात. त्यांची आर्थिक स्थितीही चांगली असते. हा मुलांक असलेले लोक खूप हुशार आणि खूप मेहनती असतात.ते त्यांचे ध्येय साध्य करण्यावर विश्वास ठेवतात. त्यांच्या ध्येयांबद्दल खूप गंभीर असतात.

ते ध्येय साध्य करण्यासाठी ते कठोर परिश्रम करतात. त्यांच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो. तसेच हो लोक नातेसंबंधात खूप चांगले असतात. नातेसंबंध कसे टिकवायचे हे देखील त्यांना चांगले माहित असतं. अंकशास्त्रानुसार, मूलांक क्रमांक 1 असलेले लोक नेतृत्व क्षमता, आत्मविश्वास आणि दृढ इच्छाशक्तीने परिपूर्ण असतात. हे गुण त्यांना नातेसंबंधांमध्ये मजबूत करण्यासाठी त्यांना मदत करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धुळ्यात एमआयएमला मोठा धक्का

Uttarakhand: उत्तराखंडमध्ये भीषण अपघात, भाविकांना घेऊन जाणारी जीप ३०० फूट खोल दरीत कोसळली, ८ जणांचा जागीच मृत्यू

Solapur Clash: सगळं सुरळीत चालू होतं,पण...; बैठकीत राडा का झाला? जन्मजयराजे भोसलेंनी दिली A टू Z माहिती

Ants: किचनमधल्या मुंग्याने त्रस्त झालात? मग करा 'हे' घरगुती उपाय

Solapur Clash: मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी; कार्यकर्त्यांमध्ये वादाची ठिणगी कुठे पडली? VIDEO

SCROLL FOR NEXT