केंद्र सरकार नेहमीच नागरिकांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना राबवतात. सरकारची अशीच एक योजना म्हणजे पीएम सुर्य घर योजना. या योजनेअंतर्गत नागरिकांना मोफत वीज मिळते. यामुळे नागरिकांना खूप फायदा होतो. तसेच पर्यावरणाचीही बचत होते.
पीएम सुर्य घर योजनेअंतर्गत तब्बल १ कोटी घरांवर सोलर रुफटॉप बसवण्याचे लक्ष सरकारचे आहे. सोलर रुफटॉप इन्स्टॉल केल्यानंतर नागरिकांना विजेचे बिल खूप कमी येईल किंवा येणारच नाही. या योजनेअंतर्गत सरकार सोलर रुफटॉप बसवण्यासाठीही सबसिडी देते. त्यामुळे सोलर बसवण्यासाठीही तुम्हाला जास्त खर्च करण्याची गरज आहे. या योजनेअंतपर्गत सरकार ३०० युनिटपर्यंतची वीज मोफत देते.
सोलर पॅनेल बसवण्यासाठी सरकार तुम्हाला पैसे देते. एक किलोवॅटसाठी १८ हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ३० हजार रुपये तर ३ किलोवॅटसाठी ७८ हजार रुपये अनुदान दिले जाईल.
या योजनेअंतर्गत ३०० युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाते. सोलर पॅनल बसवण्यासाठी ६० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते.यामुळे प्रदुषण कमी होते, तसेच वीज बिल कमी येते.
अर्ज कसा करायचा?
या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन रुफटॉप सोलर अप्लायवर क्लिक करावे लागेल.
यानंतर नोंदणीसाठी तुमचे राज्य आणि वीज वितरण कंपनी निवडावी लागेल.यानंतर आवश्यक माहिती भरुन सबमिट करा.
यानंतर रुफटॉप सोलरसाठी अर्ज करा.Discom कडून मंजुरी मिळाल्यानंतर कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्याकडून प्लांट स्थापिक करा.
इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर माहिती सबमिट करा अन् मीटरसाठी अर्ज करा. या सर्व माहितीचा कमिशनिंग रिपोर्ट सबमिट करा. यानंतर तुम्हाला ३० दिवसांत सबसिडी मिळेल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.