वैदिक ज्योतिषशास्त्राच्या तत्त्वांनुसार, गुरु आणि मंगळ यांच्यातील कोणत्याही प्रकारचा संयोग ही एक मोठी घटना असते.त्याचा परिणाम खूप दूरगामी आणि दीर्घकाळ दिसणारा असतो. गुरू ग्रह धर्म, ज्ञान, बुद्धी, संपत्ती, वैवाहिक सुख, संतती, आध्यात्मिक विकास आणि समाजातील प्रतिष्ठेचा स्वामी आहे. तर मंगळ हा शक्ती, धैर्य, क्रोध, भाऊ, जमीन, वाहन इत्यादींचा स्वामी आहे. बुधवारी १४ ऑगस्ट २०२४ च्या संध्याकाळी ८ वाजून ४७ मिनिटांला हे दोन्ही शक्तीशाली ग्रह एकत्र येणार आहेत. दोन्ही ग्रह एकत्र आल्यानंतर एक विशेष संयोग तयार होणार आहे. याचा काही राशींवर सकारात्मक परिणाम होणार आहे.
गुरू- मंगळ ग्रहाच्या युतीमुळे कन्या राशीच्या जातकांना मोठा फायदा होणार आहे. त्यांच्या जीवनात सकारात्मकता येणार आहे. धन लाभासह भौतिक सूख देखील या राशीतील लोकांना मिळणार आहे. ऑफिसमध्ये इतर सहकारी देखील चांगले वर्तन करतील, आदर करतील. तर वरिष्ठ मंडळी तुमच्या कामाचे कौतुक करतील. जे लोक तुम्हाला विरोध करतात त्यांना तुम्ही ओळखू शकाल. वडिलोपार्जित धनलाभ हेण्याची शक्यता आहे.
तूळ राशीच्या लोकांना गुरू-मंगळाच्या युतीमुळे विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ प्रलंबित कामे मार्गे लागतील. विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकाल. परीक्षेत चांगली रँक मिळण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवलेला पैशांचा चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातून नफा वाढू शकतो. मित्राच्या मदतीने घरगुती प्रश्न सुटतील. लव्ह लाईफमध्ये नवीन उबदारपणा येईल. अविवाहित लोकांना जोडीदार मिळू शकतो.
या राशीच्या जातकांसाठी हा संयोग खूप भारी असणार आहे. या राशीमधील लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. तसेच जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ते फायदेशीर ठरू शकते. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास चांगला परतावा मिळू शकतो. व्यवसायात आणखी काही गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक नफा मिळू शकतो. न्यायालयीन प्रकरणांमध्ये अनुभवी वकिलाच्या मदतीने तुम्हाला फायदा होईल. वडिलोपार्जित गोष्टींबाबत वाद व मतभेद संपुष्टात येण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमचे वाहन खरेदी करू शकता. ऑफिसमध्ये तुम्हाला तुमच्या बॉसचे पूर्ण सहकार्य मिळेल.
टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.