Shukra Gochar 2024 good or bad  yandex
धार्मिक

Shukra Gochar Rashi: 'या ' ५ राशींच्या लोकांनी व्हा सावध! २ दिवसांनी शुक्र आणणार अडचणी

Shukra Gochar 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र देव १४ एप्रिलला आपलं नक्षत्र बदलणार आहे. शुक्र देवाच्या नक्षत्र बदलामुळे अनेक राशींच्या जातकांना हा काळ अडचणीचा ठरणार आहे. शुक्र देवाच्या नक्षत्र बदलामुळे कोणत्या राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल. ते आपण पाहून घेऊ..

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Shukra Nakshatra Parivartan 2024:

ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र देवाला भैतिक सुख जसे की, धन, ऐश्वर्य, संपत्ती, यांचं ग्रह मानले गेले आहे. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र ग्रह हा व्यवस्थित असतो, तेव्हा त्या व्यक्तीचं नशीब सुद्धा साथ देत असतं. त्याचबरोबर त्या व्यक्तीचं व्यक्तीमत्व सुद्धा चमकू लागते, अशी मान्यता आहे. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र ग्रहाला तूळ आणि वृषभ राशीचा स्वामी ग्रह मानलं जातो.(Latest News)

यातील दोन राशींच्या जातकांना ऐश्वर्य, कला , सौंदर्य, संगीत, आणि वैभव मिळवत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार, १४ एप्रिलला शुक्र देव ४ वाजून ४१ मिनिटांनी रेवती नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्र बदलामुळे काही राशींच्या जातकांचे नशीब बदलणार आहे.

वृषभ राशी

या राशीच्या जातकांसाठी हा नक्षत्र बदलाचा काळ शुभ नसणार आहे. अचानक आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. जे लोक व्यवसाय किंवा कुठल्या गोष्टीचा व्यापार करत असतील त्यांच्यासाभी हा काळ अडचणीचा ठरणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नुकसान होण्याची शक्यता आहे. जे लोक नोकरी करत आहेत, त्यांच्यावर बेरोजागारीचं संकट आहे. यामुळे आपल्या वरिष्ठांसोबत चांगला वर्तवणूक चांगली ठेवा, जेणेकरून तुम्हाला मदत होईल.

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण चांगले नाही. कर्क राशीचे लोक शुक्र राशीच्या बदलामुळे अडचणीत येऊ शकतात. मानसिक तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. कामाच्या ठिकाणी खूप दबाव असू शकतो.

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांनी थोडे सावध राहणे आवश्यक आहे. विनाकारण खर्च वाढू शकतो. तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक संकट येऊ शकते. शुक्र राशीत बदल झाल्यानंतर सिंह राशीच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. इच्छा नसतानाही कर्ज घेण्याची परिस्थिती उद्भवू शकते.

तूळ

या राशीच्या जातकांनासु्द्धा हा काळ अडचणींचा राहणार आहे. शुक्र ग्रहाचे नक्षत्र बदलणं हे वेगवेगळ्या अंगाने वाईट ठरू शकते. संक्रमणानंतर नवीन जबाबदाऱ्या मिळतील. यासह त्याच्या खर्चामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जे लोक वायफळ पैसे खर्च करतात त्यांची आर्थिक स्थिती चांगली राहणार नाही. मनात तणावाची स्थिती निर्माण होण्याची शकता आहे.

वृश्चिक

शुक्र देवाचं होणारा संक्रमण हे वृश्चिक राशीच्या जातकांनासुद्धा तोट्याचं ठरणार आहे. अनेकांना आर्थिक तंगी येऊ शकते. या दरम्यान कर्जबाजारीपण येऊ शकतो. यासह वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेहणी वाद होण्यापासून दूर रहा. काही लोकांना मानसीक ताण येण्याची शक्यता आहे.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar : पालघरमधील एमआयडीसीत कंपनीला भीषण आग | VIDEO

Maharashtra Live News Update : विदर्भातील सात जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा

Maggi History: मॅगीचा शोध कोणी लावला?

EPFO Balance: पीएफ अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले? मिस्ड कॉल, SMS वरुन चुटकीसरशी करा चेक

Beed : व्याजाची रक्कम देऊनही सावकाराचा त्रास; सावकाराचे नाव चिठ्ठीत लिहून संपवले जीवन

SCROLL FOR NEXT