Shani Maha Gochar: सूर्यग्रहणाच्या २ दिवसाआधी शनिदेव बदलणार नक्षत्र; 'या' ३ राशींच्या अडचणी होण्याची शक्यता

Shani Maha Gochar 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहणाच्या २ दिवसाआधी म्हणजेच ८ एप्रिल रोजी संध्याकाळी शनिदेव आपले नक्षत्र बदलणार आहेत. यामुळे काही राशीच्या लोकांना सावध राहावे लागेल.
 Shani Maha Gochar 2024
Shani Maha Gochar 2024

Shani Maha Gochar 2024:

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अनुसार वर्ष २०२४ च्या पहिल्या पूर्ण सूर्यग्रहण ८ एप्रिलला लागणार आहे. परंतु या ग्रहणाआधी शनिदेव आपले नक्षत्र बदलणार आहेत. ज्योतिष्य शास्त्रानुसार, शनिदेव आणि सूर्य हे पिता-पूत्र मानले जातात. दरम्यान सूर्यग्रहणाआधी शनिदेवाचं नक्षत्र बदलणं हे अनेक राशींना त्रासदायक ठरणार आहे. शनिदेव आजपासून नक्षत्र परिवर्तन झालं आहे. शनिदेवाच्या नक्षत्र बदलामुळे कोणत्या राशींवर विपरित परिणाम होईल, जाणून घेऊ. (Latest News)

वृषभ राशी

ज्योतिष्यराशीनुसार, शनिदेव भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार असल्याने वृषभ राशीमधील जातकांच्या जीवनात अनेक समस्या येण्याची शक्यता आहे. यामुळे ते सतत चिंतेत राहतील. अनेकांच्या नोकरीत किंवा व्यवसायात अडचणी निर्माण होतील. तर काही लोकांच्या वैवाहिक जीवनात वाद होण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून धनहानी होऊ शकते. मानसिक तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

कर्क राशी

कर्क राशीच्या जातकांना शनिदेवचं संक्रमण त्रासदायक ठरणार आहे. जे लोकांचा व्यवसाय आहे त्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. ज्या लोकांना व्यवसायात उतरायचं आहे किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत, त्यांनी या काळात व्यवसाय सुरू करणं टाळावं. तर काही जातकांचा मित्रांकडून विश्वासघात होऊ शकतो. कोणावरही विश्वास ठेवण्यापूर्वी दोनदा विचार करा.

वृश्चिक राशी

ज्योतिष शास्त्रानुसार वृश्चिक राशीचे लोकांसाठी शनिदेवाचं नक्षत्र बदलणं त्रासदायक असणार आहे. या काळात तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. यामुळे तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेकांची वाणी कठोर राहील यामुळे वाद होण्याची शक्यता आहे.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com