वर्षातील पहिले सूर्यग्रहण 8 एप्रिल 2024 रोजी होत आहे. यावेळचे सूर्यग्रहण विशेष आहे, कारण सुमारे 54 वर्षानंतरचे हे सर्वात मोठे ग्रहण आहे. 8 एप्रिल रोजी सुमारे 4 तास 25 मिनिटांचे ग्रहण असेल. अनेक राशींवर त्याचा प्रभाव चांगला असेल, तर काहींना समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, यावेळी मीन राशीमध्ये सूर्यग्रहण होणार आहे. ज्यामुळे 5 राशींवर ग्रहणाचे सावट असेल. या राशीतील लोकांना आर्थिक समस्यांपासून ते पोटदुखीपर्यंतच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. सूर्यग्रहण काळात कोणत्या राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे, हे जाणून घेऊ... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यग्रहणामुळे मेष राशीच्या लोकांना डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय आर्थिक नुकसानही होऊ शकते. (Latest Marathi News)
सूर्यग्रहणाच्या काळात मिथुन राशीच्या लोकांची चिडचिड वाढून शकते. यातच रागाच्या भरात तुम्ही एखादा चुकीचा निर्णयही घेऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात पश्चात्ताप करावा लागू शकतो. या व्यतिरिक्त आपण आपल्या मुलाच्या आरोग्याबद्दल देखील चिंतित होऊ शकता.
वृषभ राशीच्या लोकांनी सूर्यग्रहणाच्या काळात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांचे आरोग्यही बिघडू शकते. याशिवाय या काळात तुमचे वाहनही चोरीला जाऊ शकते.
कर्क राशीला आर्थिक नुकसान होऊ शकते. याशिवाय तुमच्या कौटुंबिक बाबींवर खर्चही वाढू शकतो. ज्यामुळे तुम्हाला भविष्यात पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो. या व्यतिरिक्त यावेळी पाय आणि पोटदुखीच्या समस्येने देखील तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्या.
सूर्यग्रहण काळात धनु राशीच्या लोकांना त्यांच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. याशिवाय छातीत दुखण्याची समस्याही तुम्हाला सतावू शकते.
टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.