30 सप्टेंबरपासून सर्व सरकारी बँकांना प्रत्येक शनिवारी सुट्टी असेल असा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय... या मेसेजसोबत अर्थ मंत्रालयाची एक अधिसूचनाही जोडण्यात आलीय त्यामुळे आम्ही या व्हायरल दाव्याची आणि नोटिफिकेशनची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला... खरंच केंद्र सरकारने असा निर्णय घेतलाय का...? 30 सप्टेंबरनंतर सर्व शनिवार बँका बंद राहणार आहेत का...? यामागील खरं सत्य काय आहे...? याची प़डताळणी सुरु केली... त्याआधी व्हायरल पत्रात काय दावा करण्यात आलाय..
वित्तीय सेवा विभागाच्या SO 4275(E) नुसार विनिमय कायदा 1881 च्या कलम 25 अन्वये सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना प्रत्येक शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आलीय...हा मेसेज व्हायरल होतोय...सरकारी परिपत्रकाद्वारे हा मेसेज व्हायरल होत असल्यानं दर महिन्याच्या प्रत्येक शनिवारी बँक बंद असल्यास ग्राहकांना याचा मोठा फटका बसू शकतो...त्यामुळे यामागील खरं सत्य काय आहे...? हे जाणून घेण्यासाठी आम्ही थेट सरकारी नोंदी आणि अर्थ मंत्रालयाची निवेदने तपासली...तेव्हा काय सत्य समोर आलयं...पाहूयात...
प्रत्येक शनिवारी बँक बंद राहण्याचा दावा खोटा
अर्थ मंत्रालयाची व्हायरल अधिसूचना पूर्णपणे बनावट
आरबीआयच्या नियमांनुसार फक्त दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी
पहिला, तिसरा आणि पाचवा शनिवार बँका नियमित सुरू राहणार
3 ऑक्टोबरच्या पहिल्या शनिवारी सर्व सरकारी बँका सुरूच राहतील
त्यामुळे सोशल मीडियावर 5 दिवसांच्या बँकिंग सेवेबाबत किंवा प्रत्येक शनिवारी सुट्टी असल्याबाबत येणाऱ्या कोणत्याही बनावट मेसेजवर आणि फेक नोटिफिकेशनवर विश्वास ठेवू नका... आरबीआयच्या 2015 मधील नियमांनुसार दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीच बँका बंद राहतील... त्यामुळे कोणत्याही पहिल्या-तिसऱ्या शनिवारी बँका बंद असण्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.