Shatataraka Nakshatra  google
धार्मिक

Shatataraka Nakshatra : शततारका नक्षत्रात जन्मलेले लोकअसतात हुशार, धाडसी, पैसा आणि अधिकार मिळवणारे

Nakshatra Personality : शततारका नक्षत्रात जन्मलेले लोक अत्यंत बुद्धिमान, संशोधकवृत्तीचे, अधिकारप्रिय आणि पराक्रमी असतात. जाणून घ्या त्यांच्या करिअर, आरोग्य आणि व्यक्तिमत्वाशी संबंधित वैशिष्ट्ये.

Sakshi Sunil Jadhav

शततारका

राहू ग्रहाच्या अंमलाखाली येणारे हे नक्षत्र. चारही चरण याचे कुंभ राशीत आहेत. शत आयुष्य होण्याची प्रेरणा देणारे असे शततारका नक्षत्र आहे. या नक्षत्राच्या व्यक्ती अतिशय महत्त्वाकांक्षी असतात. चौकस, चिकित्सक, अत्यंत हुशारीने दुसऱ्यावर छाप टाकणारे, स्वतःला इतरांपेक्षा विशेष समजणारे, आपले काम असल्यास तेवढ्यापुरते त्यांच्यापेक्षा कमी प्रतीच्या लोकात मिसळून आपले काम करून घेणारे, धुर्त, अत्यंत निर्भीड, मेहनती, धाडसी, पैसा आणि अधिकाराचा हव्यास असतो.

कर्तुत्ववान, कर्तबगार, मोठ्या मनाचे, स्मरणशक्ती, ग्रहणशक्ती आकलनशक्ती उत्तम, व्यवहारी वृत्ती जास्त, संशोधन वृत्ती चांगली - त्यामुळे बुद्धी, अधिकार, कर्तबगार, पराक्रमी, व्यक्ती या नक्षत्रावर असतात. ऐशोआराम आणि श्रीमंतीची आवड असते, विलासी, दुसऱ्यांचे दोष शोधाणारे, भेसळ करणे आवडते.

नोकरी व्यवसाय

या नक्षत्राच्या व्यक्ती संशोधक, वैज्ञानिक, तसेच तांत्रिक संशोधक म्हणून ओळखले जातात. कंप्यूटर मध्ये नवीन सॉफ्टवेअर तयार करणे, खगोलशास्त्रात प्रगती, पॅरासायकॉलॉजी, विद्युत कार्यात तरबेज, ऊर्जा सिद्धांत कार्यात पुढे, संशोधन, स्टॉक एक्सचेंज मध्ये, तुरुंग निरीक्षक, गुप्तहेर खाते, अधिकारी, तेल विभाग, पेट्रोलियम मध्ये संशोधन, फोटोग्राफी, ग्राफिक, टीव्ही सिनेमा क्षेत्रात अग्रेसर, डायरेक्टर, जुन्या लिपीचा अभ्यास, सिनेमा, टीव्हीवर एडिटिंग करणे इत्यादी.

रोग आजार

या नक्षत्राच्या व्यक्तींना रक्ताभिसरण दोष, हृदयाभिसरण मध्ये दोष, हृदयविकार, गुडघे दुखणे, संधिवात, कापणे, भाजणे, मानसिक विकार, मेंदूची शीर तुटणे, असे गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. किरकोळ आजार या व्यक्तींच्या फारसे वाट्याला येत नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tesla Car: टेस्लाच्या पहिल्या कारची किंमत किती?

Ashti News : निर्दयतेचा कळस; विष कालवले अन्न टाकले खायला; विषबाधेने १६ कुत्र्यांचा मृत्यू

Weather Update: राज्यभर पावसाचा अंदाज, कोकण, विदर्भाला यलो अलर्ट, जाणून घ्या हवामानाची स्थिती|VIDEO

Eng vs Ind 4th Test: चौथ्या कसोटीपूर्वी टीम इंडियामध्ये मोठा बदल; धाकड गोलंदाजाची संघात एन्ट्री

Deep Amavasya : श्रावणाआधी दीप पूजन का करतात? पारंपरिक पद्धतीसह संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT