Union Bank Job Saam Tv
naukri-job-news

Union Bank Job: यूनियन बँकेत ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी; १५०० रिक्त जागा; पगार ८५०००; पात्रता काय? जाणून घ्या

Union Bank Recruitment 2024: बँकेत नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. यूनियन बँकेत सध्या १५०० ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. यूनियन बँकेत सध्या भरती सुरु आहे.लोकल बँक ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

यूनियन बँकेत १५०० रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया आजपासून म्हणजे २४ ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ नोव्हेंबर २०२४ आहे. (Union Bank Recruitment)

बँकिंग क्षेत्रात ज्या उमेदवारांना स्वतः चे करिअर करायचे आहे त्यांनी या नोकरीसाठी लवकरात लवकर अर्ज करावेत.या नोकरीबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

यूनियन बँकेत लोकल बँक ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.बँक ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयात ही नोकरीची संधी आहे. त्यामुळे यूनियन बँकेत ऑफिसर होण्याची चांगली संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलेले असावे. (Union Bank Job)

या नोकरीसाठी उमेदवारांना ४८४८० ते ८५९२० रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण करावे लागेल. यानंतर सर्व माहिती भरावी. यानंतर अर्ज शुल्क भरुन फॉ़र्म सबमिट करा. (Union Bank Application Process)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali: 'मदन मंजिरी, सुबक ठेंगणी...' जवळच्या मैत्रिणींने सांगितला 'फुलवंतीचा' १२ वर्षाचा प्रवास

Diwali: दिवाळीला सर्वात सुंदर दिसायचंय? या सोप्या टीप्स फॉलो करा

Maharashtra News Live Updates: आमदार बबन शिंदेच्या मुलाचा उमेदवारी अर्ज दाखल

Parbhani Tourist Places: मंदिरे,स्मारके अन् बरचं काही परभणीमधील 'या' सुंदर स्थळांना नक्की भेट द्या

Success Story: अवघ्या २००० रूपयांची गुंतवणूक करून सुरु केला वेगळा बिझनेस; आज कमावतात लाखोंनी पैसा

SCROLL FOR NEXT