Maharashtra Election : CM एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाने निष्ठावंत उतरवला; आतापर्यंत कोणाला मिळाले एबी फॉर्म ? वाचा

maharashtra assembly election 2024 : मुख्यमंत्री शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाने निष्ठावंत उतरवला आहे. ठाकरे गटाने ३५ जणांना उमेदवारी जाहीर केली आहे.
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Uddhav Thackeray Vs Eknath ShindeSaam Tv
Published On

मुंबई : विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. महायुतीतील तिन्ही प्रमुख पक्षाने उमेदवार जाहीर केले आहेत. महायुतीनंतर आता महाविकास आघाडीचे उमेदवार कधी जाहीर होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. महाविकास आघाडीने यादी जाहीर करण्याआधीच एबीफॉर्म वाटप सुरु केले आहे. ठाकरे गटानेही त्यांच्या उमेदवारांना एबीफॉर्मचे वाटप केले. ठाणे शहरात ठाकरे गटाने माजी खासदार राजन विचारे यांना एबी फॉर्म दिला आहे.

भाजपकडून ठाणे शहर विधानसभा मतदारसंघासाठी विद्यमान आमदार संजय केळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. संजय केळकर यांच्या उमेदवारानंतर शिंदे गटाने नाराजी देखील व्यक्त केली. तसेच संजय केळकर यांच्या विरोधात बंडखोरी होणार असल्याचा दावा केला जात आहे. या मतदारसंघात शिंदे गटाच्या मिनाक्षी शिंदे यांनीही अर्ज घेतला आहे.

तर भाजपचे ज्येष्ठ माजी नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनीही अर्ज घेणार असल्याची माहिती हाती आली आहे. याचदरम्यान, ठाकरे गटाकडून ठाणे शहरात माजी खासदार राजन विचारे यांना एबी फॉर्म मिळाला आहे. तर मनसेकडून अविनाश जाधव रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे ठाणे शहर मतदारसंघातील लढाईकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Maharashtra Election : अमित ठाकरे विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंना संदिप देशपांडे देणार टक्कर; वाचा मनसे उमेदवारांची यादी

एबी फॉर्म स्वीकारलेले ठाकरे गटाचे उमेदवार

१)सुधाकर बडगुजर(नाशिक पश्चिम)

२)वसंत गिते(नाशिक मध्य)

३ )अद्वय हिरे (मालेगाव बाह्य)

४)एकनाथ पवार (लोहा कंधार)

५ )के पी पाटील, राधानगरी विधानसभा

६ )बाळ माने, रत्नागिरी विधानसभा

७) उदेश पाटेकर, मागाठाणे विधानसभा

८ )अमर पाटील, सोलापूर दक्षिण

९) गणेश धात्रक, नांदगाव

१०)दीपक आबा साळुंखे पाटील, सांगोला

११) प्रविणा मोरजकर, कुर्ला

१२) एम के मढवी, ऐरोली

१३) भास्कर जाधव, गुहागर

१४)वैभव नाईक, कुडाळ

१५) राजन साळवी, राजापूर लांजा

१६) आदित्य ठाकरे, वरळी

१७) संजय पोतनीस, कलिना

१८) सुनील प्रभू, दिंडोशी

१९) राजन विचारे, ठाणे शहर

२०) दीपेश म्हात्रे, डोंबिवली

२१) कैलास पाटील, धाराशिव

२२) मनोहर भोईर, उरण

२३) महेश सावंत, माहीम

२४)श्रद्धा जाधव, वडाळा

२५) पाचोरा - वैशाली सूर्यवंशी

२६) नितीन देशमुख - बाळापूर

२७) कन्नड मतदारसंघ - उदयसिंह राजपूत

२८) राहुल पाटील - परभणी

२९) शंकरराव गडाख -नेवासा

३०) सुभाष भोईर - कल्याण ग्रामीण

३१) सुनील राऊत - विक्रोळी

३२) रमेश कोरगावकर भांडुप पश्चिम

३३) उन्मेश पाटील - चाळीसगाव

३४) स्नेहल जगताप - महाड

३५) ऋतुजा लटके - अंधेरी पूर्व

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com