naukri-job-news

Indian Railway Bharti: दहावी पास विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, भारतीय रेल्वेत तब्बल २४३८ पदांसाठी भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Siddhi Hande

रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. दक्षिण रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. २०२४-२५ या वर्षामध्ये विविध ट्रेडमध्ये २४०० पेक्षा अधिक पदांसाठी भरती सुरु आहे. याबाबत दक्षिण रेल्वेने १८ जुलै रोजी अधिसूचना जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑगस्ट आहे.

दक्षिण रेल्वेत शिकाऊ पदांसाठी ही भरती सुरु करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही sr.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज करावा लागेल. तुम्हाला या नोकरीसाठी ऑनलाइन अर्ज पोर्टला भेट द्यावी लागेल. त्यानंतर नोंदणी करुन अर्ज दाखल करावा लागेल.

शिकाऊ पदांसाठी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून किमान ५० गुणांसह १० वी आणि १२वी उत्तीर्ण झालेले असावे. तर XITI च्या बाबतीत, १० वी नंतर ITI किंवा NCVT पास उमेदवार अर्ज करु शकतात. त्यामुळे सरकारी नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

या नोकरीसाठी १५ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या वयोमर्यादेत राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ ते ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट द्या. या नोकरीसाठी तामिळनाडू, केरळ, अंदमान निकोबार, लक्षद्वीप, आंध्र प्रदेश, कर्नाटक या प्रदेशातील रहिवासी अर्ज करु शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: 15 लाखाचे पंधराशे का केले? लाडकी बहीण योजेनवरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारला घेरलं

Uddhav Thackeray : भाजपच्या रोपट्याला गुलाबी अळी लागली, ठाकरेंनी अजित पवारांवर तोफ डागली

Goa : गोव्यातील 'या' गावाची पर्यटकांना पडली भुरळ

Akshay Shinde Funeral: अक्षय शिंदेचा दफनविधी पूर्ण, मोठ्या पोलीस बंदोबस्तात उल्हासनगरमध्ये अंत्यसंस्कार

Marathi News Live Updates : दोन महिन्यात राज्यात MVA सरकार येणार - अनिल देशमुखांचा विश्वास

SCROLL FOR NEXT