SBI Job Saam Tv
naukri-job-news

SBI Recruitment: खुशखबर! कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार स्टेट बँकेत नोकरी; पगार ६५००० रुपये; पात्रता काय? अर्ज कसा करावा?

SBI Recruitment 2025: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. स्टेट बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता स्टेट बँकेत ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. स्टेट बँकेत स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी आणि रिव्यूअर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ऑफिसर पदावर तुम्ही काम करु शकतात.

स्टेट बँकेने (State Bank Of India) या नोकरीसाठी अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जाहीर केली आहे. या अधिसूचनेनुसार, तुम्हाला या नोकरीसाठी कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाहीये. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २ एप्रिलपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ एप्रिल २०२५ आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

स्टेट बँक ऑफ इंडियात भरती (SBI Recruitment)

स्टेट बँकेत स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने एमबीए किंवा एक्झिक्युटिव्ह एमबीए पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत १० वर्षांचा कामाचा अनुभव असावा. तर एसबीआय ईआरएस रिव्यूअर पदासाठी SMGS-IV/V ग्रेडमधून SBI/e-ABs रिटायर्ड झालेले उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

स्टेट बँकेत रिव्ह्यूवर पदासाठी ५०,००० ते ६५००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे रहोणार आहे. स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी २८-५५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी भरती ही कोलकत्ता येथे होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

WhatsApp Security : व्हॉट्सअ‍ॅप कधीच होणार नाही हॅक, सायबर एक्सपरर्टने दिला भन्नाट सल्ला

Maharashtra Live News Update: राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

SCROLL FOR NEXT