SBI Recruitment Saam Tv
naukri-job-news

SBI Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार स्टेट बँकेत नोकरी; २७३ रिक्त पदे, पगार १ लाख रुपये; अर्ज कसा करावा?

SBI Recruitment 2025: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. स्टेट बँकेत सध्या मॅनेजर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. स्टेट बँकेत विविध पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. स्टेट बँकेत २७३ पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ मार्च आहे.

स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर sbi.co.in याबाबत माहिती देण्यात आली आहे. या भरती मोहिमेत मॅनेजर रिटेल प्रोडक्ट्स, एफएलसी काउंसलर्स आणि एफएलसी डायरेक्टर्स पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.स्टेट बँकेत २६३ पदे ही एफएलसी काउंसलर्स पदासाठी आहेत. तर एफएलसी डायरेक्टर्ससाठी ६ पदे आहे. रिटेल प्रोडक्ट्स मॅनेजर पदासाठी ४ जागा रिक्त आहेत.

एसबीआयमधील या नोकरीसाठी विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे. मॅनेजर रिटेल प्रोडक्ट्स पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीए, पीजीडीएम, पीजीपीएम, एमएमएस पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत ५ वर्षांचा अनुभव असावा.

एफएलसी काउंसलर आणि एफएलसी डायरेक्टर पदासाठी रिटायर्ड ऑफिसर अर्ज करु शकतात. २८ ते ४० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीद्वारे होणार आहे. मेरिट लिस्टनंतर मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे. एसबीआयमधील रिटेल प्रोडक्ट्स मॅनेजर पदासाठी १,०५,२८० रुपये पगार मिळणार आहे. एफएलसी काउंसलर्स पदासाठी ५०,००० रुपये तर एफएलसी डायरेक्टर पदासाठी ७५००० रुपये पगार मिळणार आहे.

स्टेट बँकेच्या या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर लॉग इन करा अन् फॉर्म भरा. यानंतर शुल्क भरुन फॉर्म सबमिट करा. या फॉर्मची प्रिंट आउट तुमच्याजवळ ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT