SBI Bank News  Saam Tv
naukri-job-news

SBI CBO Reruitment: स्टेट बँकेत नोकरी; २,२७३ पदांसाठी भरती; पगार मिळणार ८५,९२०; अर्ज कसा करावा?

SBI CBO Recruitment 2026: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. सर्किल बेस्ड ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचा आहे.

Siddhi Hande

सरकारी बँकेत नोकरीची संधी

स्टेट बँकेत २ हजारांपेक्षा जास्त पदांसाठी भरती

सर्किल बेस्ड ऑफिसर पदांसाठी भरती

सरकारी नोकरीची तयारी करत असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. स्टेट बँकेने २ हजारपेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचा आहे.

देशभरात १६ ठिकाणी सर्किल बेस्ड ऑफिसर पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया काल म्हणजेच २९ जानेवारीपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ibpsreg.ibps.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

स्टेट बँकेची भरती महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, ओडिशा, जम्मू काश्मीर, तामिळनाडू, गुजरात, आसाम, तेलंगणा, राजस्थान, गोवा, उत्तर प्रदेश, राजस्थान, केरळ या ठिकाणी होणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचा आहे.

स्टेट बँकेतील या भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन केलेले असावे. याचसोबत मेडिकल,इंजिनियरिंग, चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट यामध्ये पदवीप्राप्त उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. २१ ते ३० वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

२२७३ पदांसाठी भरती

स्टेट बँकेत एकूण २२७३ पदांसाठी भरती केली जाणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ फेब्रुवारी २०२६ आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ४८४८० ते ८५९२० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी बेसिक सॅलरी ४८,४८० रुपये असणार आहे.

भरती प्रक्रिया

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, स्क्रिनिंग, इंटरव्ह्यू आणि स्थानिक भाषा टेस्टद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना ७५० रुपये शुल्क भरायचे आहे. तुम्हाला  sbi.bank.in वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. ही भरती आयबीपीएसद्वारे केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : प्रेम विवाहाला विरोध, मेव्हण्याने भाऊजीचा काटा काढला; हॉटेलवर जेवायला नेलं नंतर..., सोलापुरात भयानक हत्याकांड

Maharashtra Budget 2026: अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्री अर्थसंकल्प मांडणार, अर्थ - नियोजन खातं देवेंद्र फडणवीसांकडे?

Maharashtra Live News Update: नाशिक महापालिकेच्या महापौर पदाचा चेहरा ३ फेब्रुवारीला होणार स्पष्ट

Mardaani 3: राणी मुखर्जीचा मर्दानी ३ करणार ग्रँड ओपनिंग; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये केली बंपर

Mangesh Kalokhe : २० लाख नाही तर १ कोटींची सुपारी दिली, मंगेश काळोखे हत्या प्रकरणात शिंदेंच्या आमदाराचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT