RITES Recruitment  Saam Tv
naukri-job-news

RITES Recruitment: रेल्वे मंत्रालयाच्या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार भरघोस पगार; पात्रता काय? वाचा

RITES Recruitment 2025: राइट्स लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. कंपनीत असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी

राइट्स कंपनीत भरती सुरु

असिस्टंट मॅनेजर पदासाठी होणार भरती

चांगल्या कंपनीत नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते.आता तुम्हाला सरकारी कंपनीत नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. राइट्स लिमिटेडमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. राइट्स लिमिटेड ही रेल्वे मंत्रालयाअंतर्गत काम करते. या कंपनीत असिस्टंट मॅनेजर पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

राइट्समधील नोकरीबाबत सविस्तर माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर मिळणार आहे. जर तुम्ही इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले असेल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. या नोकरीबाबत www.rites.com वर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २५ डिसेंबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ डिसेंबर २०२५ असणार आहे.

राइट्स लिमिटेडमधील ही भरती सिविल, इलेक्ट्रिकल, सिग्नल अँड टेलीकम्युनिकेशन, मेकॅनिकल, मेटलर्जिकल, केमिकल, फार्मा फूड टेक्नोलॉजी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

पात्रता

राइट्समधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिविल इंजिनियरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर सप्लाय, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल इंजिनियरिंग, कॉम्प्युटर इंजिनियरिंग, फार्मसीमध्ये डिग्री प्राप्त केलेली असावी. याचसोबत उमेदवारांना संबंधित क्षेत्रात २ वर्षांचा कामाचा अनुभव असायला हवा.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे होणार आहे. लेखी परीक्षा ११ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.यानंतर इंटरव्ह्यूसाठी बोलावले जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर ४२,४७८ रुपये पगार मिळणार आहे.

अर्ज कसा करावा?

सर्वात आधी तुम्हाला http://www.rites.com वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर रजिस्ट्रेशन करावे. यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती भरुन सबमिट करायची आहे.

यानंतर लॉग इन केल्यानंतर सर्व माहिती भरा. सही आणि फोटो अपलोड करावा.

यानंतर फॉर्म सबमिट करावा. त्याआधी प्रिंट आउट काढून ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kothimbir Thepla Recipe : सकाळी नाश्त्यासाठी काय करायचे हा प्रश्न पडलाय? मग करा झटपट गरमागरम कोथिंबीर थेपला

Maharashtra Live News Update : मुंबईत भाजपला १३७ तर शिवसेनेला ९० जागा

Shocking: दीड मिनिटांत ७२ वेळा वार, कोल्हापूरच्या तरुणावर तमिळनाडूत कोयत्याने हल्ला; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

Shocking : संशयाचं भूत राहुलच्या डोक्यात शिरलं, गाढ झोपलेल्या बायको अन् मुलाची कुऱ्हाडीने हत्या, दुहेरी हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला

पुण्यात शरद पवार-अजित पवारांचं ठरलं, वाचा कोण किती जागा लढवणार

SCROLL FOR NEXT