RITES Recruitment Saam Tv
naukri-job-news

RITES Recruitment: RITES मध्ये नोकरीची संधी;मिळणार २५०००० रुपये पगार;जाणून घ्या सविस्तर

RITES Recruitment 2024: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्व्हिस लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्व्हिस लिमिटेड येथे नोकरीची संधी आहे. कंसल्टंट पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवाराने अधिकृत वेबसाइट rites.com वर जाऊन अर्ज करावा. सरकारी नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. (RITES Recruitment)

या मोहिमेद्वारे एकूण ११ पदे भरती केली जाणार आहे. रेजिडेंट इंजिनियर, वरिष्ठ योजना आणि शेड्युलिंग तज्ज्ञ, रेजिडेंट इंजिनियर पदासाठी रिक्त जागा आहेत.या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात डिप्लोमा किंवा पदवी प्राप्त केलेली असावी. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

या नोकरीसाठी उमेदवाराचे कमाल वय ६३ वर्ष असावे.या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवाराला ८५,००० ते २,५०,००० रुपये मालिक वेतन दिले जाईल.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ सप्टेंबर २०२४ आहे. जर तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी करायची असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे.

याचसोबत बँकेतही नोकरी करण्याची संधी आहे. यूनियन बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु आहे. एकूण ५०० जागांवर ही भरती करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण आहे आणि नोकरीच्या शोधात आहे. त्यांनी या नोकरीसाठी अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT