डायबिटीज हा आज केवळ मोठ्यांपर्यंतच मर्यादित राहिलेला नसून आता लहान मुलांमध्येही टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढताना दिसत आहे. दिवसभर एकाच जागी बसून काम करणे, तासनतास मोबाईल आणि संगणकाचा वापर करणे, शारीरिक हालचालींचा अभाव, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि अपुरी झोप यामुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे शरीराकडून मिळणाऱ्या सुरुवातीच्या संकेतांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, बदललेली जीवनशैली मधुमेहाच्या वाढत्या धोक्यामागील महत्त्वाचे कारण आहे. दिवसभर बैठे काम, जंक फूडचे अतिसेवन, अनियमित आहार, अपुरी झोप आणि सततचा मानसिक ताण यांचा आरोग्यावर परिणाम होतो. विशेषतः लहान मुलांमध्ये शारीरिक हालचाली कमी झाल्याने टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
मधुमेहाची सुरुवातीची लक्षणे ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः मुलांमध्ये टाइप-१ मधुमेहाची चार प्रमुख लक्षणे '4T' या नावाने ओळखली जातात.नेहमीपेक्षा जास्त वेळा लघवीला जाणे, विशेषतः रात्री वारंवार लघवी होणे.
सतत पाणी प्यावेसे वाटणे आणि पाणी पिऊनही तहान न भागणे.
पुरेशी विश्रांती घेऊनही अशक्तपणा आणि थकवा जाणवणे.
आहारात कोणताही बदल नसतानाही शरीराचे वजन वेगाने कमी होणे. ही लक्षणे दिसल्यास वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लहानपणापासूनच आरोग्यदायी सवयी लावल्यास मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते. यासाठी दररोज व्यायाम करणे, मैदानी खेळ खेळणे, संतुलित आहार घेणे आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. मुलांचा मोबाईल आणि संगणकासमोरील वेळ मर्यादित ठेवण्याबरोबरच त्यांना शारीरिक हालचालींसाठी प्रोत्साहित करणेही महत्त्वाचे आहे.
मधुमेहाचे निदान होणे एवढेच पुरेसे नाही, तर मुलांना या आजाराचे योग्य व्यवस्थापन करता येणेही आवश्यक आहे. यामध्ये पालक आणि शाळेची भूमिका महत्त्वाची आहे. योग्य वैद्यकीय सल्ला, कुटुंबाचा पाठिंबा आणि नियमित उपचार यांच्या मदतीने मधुमेह असलेली मुलेही सक्रिय आणि निरोगी जीवन जगू शकतात. मधुमेहाची लक्षणे वेळीच ओळखणे, नियमित तपासणी करणे आणि जीवनशैलीत योग्य बदल करणे हेच या आजारापासून बचावासाठी महत्त्वाचे आहे. विशेषतः मुलांच्या आरोग्याकडे पालकांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.