

नोकरी करण्याऱ्यांसाठी पीएफ खूप महत्त्वाचा भाग असतो. कारण त्यांच्या रिटायरमेंटनंतर त्यांना आर्थिक आधार म्हणून याची मदत होते. बरेच कर्मचारी रिटायर झाल्यावर त्यांच्या पीएफमधली संपूर्ण रक्कम एकदाच काढण्याचा विचार करतात. मात्र आता EPFO ने या नियमात बदल केला आहे. आता तुम्ही पीएफ एकदाच न काढता दर महिन्याला किंवा ठराविक कालावधीनंतर हप्त्यांमध्ये काढता येणार आहे.
१९ नोव्हेंबर २०२६ रोजी केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची (CBT) २४० वी बैठक झाली. या बैठकीत रिटायरमेंटनंतर पीएफची रक्कम हप्त्यांमध्ये काढण्याच्या Systematic Withdrawal Plan (SWP) ला मंजुरी देण्यात आली. या सुविधेमुळे कर्मचाऱ्यांना संपूर्ण पीएफ रक्कम एकाच वेळी काढण्याची गरज राहणार नाही. गरजेनुसार व्याज मिळत राहील.
नव्या प्रस्तावानुसार कर्मचाऱ्यांना तीन पर्याय मिळू शकतात.
मासिक: दर महिन्याला ठराविक रक्कम काढता येईल.
तिमाही: दर तीन महिन्यांनी पैसे काढता येतील.
सहामाही: दर सहा महिन्यांनी पैसे काढता येतील.
म्हणजे, एखाद्या कर्मचाऱ्याला पीएफ खात्यात २० लाख रुपये जमा असतील, तर संपूर्ण रक्कम काढण्याऐवजी गरजेनुसार हप्त्यांमध्ये पैसे घेता येतील.
या योजनेतला महत्त्वाचा मु्द्दा म्हणजे टॅक्स. हप्त्यांमध्ये पीएफ काढताना कराचे नियम सोपे करण्यासाठी श्रम मंत्रालयाने वित्त मंत्रालयाशी चर्चा करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. पण प्रत्येक हप्ता टॅक्स- फ्री असेल, अशी अधिकृत घोषणा अजून झालेली नाही. सध्याच्या नियमानुसार, सलग पाच वर्षांची पात्र सेवा पूर्ण काढल्याने काही अटींनुसार कर लागू होऊ शकतो.
या सुविधेच्या सुरुवातीच्या टप्प्यात ५५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि पीएफ खात्यात ५ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम असलेल्या सुमारे ६.३२ लाख सदस्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. तसेच पात्र कर्मचाऱ्यांना EPS अंतर्गत मासिक पेन्शनही मिळू शकते.
EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने SWP योजनेला मंजुरी दिली असली, तरी प्रत्यक्षात अंमलबजावणीसाठी अधिकृत अधिसूचना आणि नियमांमध्ये आवश्यक बदल होणं बाकी आहे. त्यामुळे ही सुविधा नेमकी कधी सुरू होणार आणि टॅक्सचे नियम काय असतीलस हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.