कल्याण-नवी मुंबईचा प्रवास सुसाट होणार, ऐरोली कॉरिडॉरचे काम अंतिम टप्प्यात, या भागातील वाहतूककोंडी फुटणार

Kalyan Navi Mumbai Connectivity : कल्याण-डोंबिवली ते नवी मुंबई प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. एमएमआरडीएच्या ऐरोली-काटई नाका कॉरिडॉरचे काम अंतिम टप्प्यात असून, दुहेरी बोगदा आणि उन्नत मार्ग वाहतुकीसाठी खुले होणार आहेत.
Airoli Katai flyover completion update
Airoli Katai flyover completion updatesaam tv
Published On: 

Airoli Katai Naka Corridor, Kalyan Navi Mumbai Connectivity : नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवलीदरम्यानचा प्रवास वेगवान आणि सुरक्षित प्रवास व्हावा म्हणून एमएमआरडीएकडून उभारल्या जात असलेल्या ऐरोली-काटई नाका कॉरिडॉरचे काम वेगात सुरू आहे. सुमारे १३ किलोमीटर लांबीचा हा कॉरिडॉर तीन टप्प्यांत उभारला जात असून, त्यापैकी टप्पा १ आणि टप्पा २ अंतिम टप्प्यात आहे.

ऐरोली-काटई नाका कॉरिडॉरचे काम सध्या वेगवाने सुरू आहे. एमएमआरडीएकडून हे काम करण्यात येत आहे. त्याची मंगळवारी एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी पाहणी केली. ऐरोली-काटई नाका कॉरिडॉरचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासातील ३० ते ४५ मिनिटे वाचणार आहेत. तसेच प्रवासाचे अंतर ७ ते ८ किलोमीटरने कमी होणार आहे.

सध्या टप्पा १ आणि टप्पा २ अंतिम टप्प्यात आहे. मंगळवारी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण मार्गाची पाहणी करीत पूर्ण झालेले रस्ते, सुरू असलेली अंतिम कामे आणि बोगद्याच्या दोन्ही बाजूंना करण्यात येत असलेल्या सुरक्षा उपायांचा आढावा घेतला. तसेच उर्वरित कामे तातडीने पूर्ण करताना गुणवत्ता आणि सुरक्षिततेचे सर्वोच्च मानक राखण्याचे निर्देश एमएमआरडीएच्या आयुक्तांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले.

Airoli Katai flyover completion update
Rice Price : तांदळाच्या किमतींबाबत सरकारचा मास्टरस्ट्रोक! थेट २०% टॅक्स लागणार; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

टप्पा १ आणि २ मध्ये १.६९ किलोमीटर लांबीचा दुहेरी 1 बोगदा आणि उन्नत मार्गाचा समावेश आहे, हे दोन्ही टप्पे एकाच वेळी वाहतुकीसाठी खुले करण्याची तयारी सुरू आहे. यामुळे ऐरोली ते मुंब्रा येथील राष्ट्रीय महामार्ग-४ पर्यंत थेट जोडणी मिळणार आहे.

Airoli Katai flyover completion update
बाहेरचा शोरमा खाताय? सावधान! भिवंडीत शोरमा खाल्ल्याने 42 जण रुग्णालयात, लहान मुलांसह गरोदर महिलेचीही प्रकृती बिघडली

ऐरोली शहर, ठाणे-बेलापूर रोड, महापे, शिळफाटा 2 आज शहर, गुफा का राण्ड लाई पर्यायी माट मिळणार आहे. टप्पा ३ मध्ये हा कॉरिडॉर काटई नाक्यापर्यंत वाढवला जाणार आहे. पूर्ण कॉरिडॉरमुळे नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली परिसरातील जोडणी आमूलाग्र बदलणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.