RBI Internship Saam Tv
naukri-job-news

RBI Internship: रिझर्व्ह बँकेत इंटर्नशिप करण्याची उत्तम संधी; पदवीधर उमेदवार करु शकतात अर्ज; जाणून घ्या सविस्तर

RBI Summer Internship 2024: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेत इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.

Siddhi Hande

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये इंटर्नशिप करण्याची चांगली संधी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने समर इंटर्नशिप प्रोग्रामसाठी रजिस्ट्रेशन सुरु केले आहे. त्यामुळे ज्या तरुणांचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यांच्यासाठी कामाचा अनुभव घेण्याची ही चांगली संधी आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या समर इंटर्नशिप प्रोग्रामसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन फॉर्म भरायचा आहे. या इंटर्नशिपसाठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ डिसेंबर २०२४ आहे. (RBI Summer Internship)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या या इंटर्नशिपसाठी मॅनेजमेंट, स्टॅटिस्टिक, लॉ, बँकिंग, इकोनॉमिक्स, कॉमर्स, इकोनॉमिट्रिक्सस, फायनान्स या विषयात पोस्ट ग्रॅज्युएट, तसेच ५ किंवा तीन वर्षांचा डिग्री कोर्स केलेला असावा. जे तरुण डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला आहे त्या विद्यार्थीदेखील या इंटर्नशिपसाठी रजिस्ट्रेशन करु शकतात. या नोकरीसाठी इंटर्नशिप एप्रिल महिन्यात सुरु होणार आहे. त्यामुळे देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरी करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.

या इंटर्नशिपसाठी देशासह परदेशात शिकणारे तरुणदेखील अर्ज करु शकतात. या इंटर्नशिपसाठी निवड झालेल्या उमेदवारांना २०,००० रुपयांची स्टायपेंड दिली जाणार आहे. (RBI Summer Internship Application Process)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या या इंटर्नशिपसाठी १२५ विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या इंटर्नशिपसाठी निवड झालेल्या उमेदवारांनी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात मुलाखतीसाठी बोलावले जाईल. याबाबत अधिक माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar : चांदसैली घाटात दरड कोसळली; थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

Poco M7 Plus 5G: पोकोने लाँच केला नवीन स्मार्टफोन; ७०००mAh बॅटरी आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या किंमत

Coolie vs War 2: रजनीकांतच्या 'कुली' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्ये चढोओढ; तिसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

SCROLL FOR NEXT