RBI Recruitment Saam Tv
naukri-job-news

RBI Jobs: भरघोस पगार अन् अन् आरबीआयमध्ये नोकरी, तब्बल ६५० जागांसाठी निघाले फॉर्म; अर्ज कसा करावा?

RBI Assistant Recruitment 2026: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. आरबीआय असिस्टंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी

असिस्टंट पदासाठी भरती सुरु

पात्रता अन् अर्जप्रक्रिया काय? वाचा सविस्तर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. आरबीआयमध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधील नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. असिस्टंट पदावर नोकरी करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.

रिझर्व्ह बँकेत असिस्टंट पदासाठी भरती (RBI Assistant Recruitment 2026)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये एकूण ६५० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही opportunities.rbi.org.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १६ फेब्रुवारी २०२६ पासून सुरु झाली आहे.

आरबीआय असिस्टंट पदावर काम करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. देशभरातली अनेक ऑफिससाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. अहमदाबाद, बंगळुरु, जयपूर, मुंबई, कोलकत्ता, दिल्ली अशा अनेक ठिकाणी ही भरती केली जाणार आहे. ६५० पदांसाठी भरती केली जाणार आहे.

आरबीआय असिस्टंट पदासाठी पात्रता (RBI Assistant Eligibility)

रिझर्व्ह बँकेतील नोकरीसाठी इच्छुकांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलेले असावे. २० ते २८ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला स्थानिक भाषा यायला हवी.

पगार (RBI Assistant Salary)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १६ फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मार्च २०२६ आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर बेसिक पे २९,००० रुपये मिळणार आहे. तुम्हाला इतर भत्ते मिळून एकूण ५८,५१४ रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड प्रिलियम्स, मेन्स, लँग्वेज प्रोफिशिएंसी टेस्टद्वारे केली जाणार आहे. ही परीक्षा ११ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्ग लगत नवनगरे विकसित करण्याचा सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बारगळला

राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी संपावर! २१ एप्रिलपासून मोठे आंदोलन, तुमच्यावर काय होणार परिणाम?

Actress Bought New Home: प्रसिद्ध अभिनेत्रीने वर्सोवामध्ये खरेदी केलं कोट्यवधीचं आलिशान घर, किंमत वाचून व्हाल हैराण

High blood pressure: अचानक बीपी वाढलाय? या ५ पद्धतींनी लगेच कमी होईल रक्तदाब, डॉक्टरांनी दिल्या महत्त्वाच्या टीप्स

पुण्यात थरार! भिडे पुलाजवळ तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, नेमकं कारण काय ?

SCROLL FOR NEXT