HCL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; पगार मिळणार ७०,०००; अर्ज कुठे अन् कसा करावा?

HCL Recruitment 2026: हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. टेक्निकल फिल्डमध्ये करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. त्यामुळे इच्छुकांनी अर्ज करायचे आहे.
HCL Recruitment
HCL RecruitmentSaam Tv
Published On
Summary

सरकारी कंपनीत नोकरीची संधी

हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये भरती

पगार मिळणार ७०,००० रुपये

सरकारी कंपनीत (Government Job) नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. टेक्निकल फिल्डमध्ये नोकरी करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत.

HCL Recruitment
NPCIL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; पगार ५५,९३२ रुपये; अर्ज कसा करावा?

हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये चार्जमन, इलेक्ट्रिशियन, WED पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. तुम्ही www.hindustancopper.com वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये १८ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

पगार

हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमधील नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना २८,१२० ते ७२,११० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत इतर भत्तेदेखील मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, ट्रेड टेस्ट अँड रायटिंग एलिजिबिलिटी टेस्टद्वारे होणार आहे.

HCL Recruitment
Prasar Bharti Job: प्रसार भारतीमध्ये सरकारी नोकरीची संधी; पात्रता काय? अर्ज कसा करावा? वाचा

पात्रता

चार्जमॅन पदासाठी इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा आणि मायनिंग इन्स्टॉलेशनमध्ये १ वर्षांचा कामाचा अनुभव असावा. याचसोबत आयटीआयमध्ये ३ वर्षांचा मायनिंग इन्स्टॉलेशन सुपरवायजरचा अनुभव असायला हवा. इलेक्ट्रिशियन पदासाठी आयटीआयसोबतच इलेक्ट्रिशियन म्हणून ४ वर्षांचा अनुभव असायला हवे. WED पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. BA/B.Sc/B.com/BBA केलेले असावे. याचसोबत १ वर्षाचा कामाचा अनुभव असावा.

HCL Recruitment
SBI Jobs: स्टेट बँकेत नोकरीची संधी; २२०० पेक्षा जास्त पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com