Delhi Blast: बॉम्ब स्फोटप्रकरणी तपास यंत्रणेला मोठं यश; पुलवामा येथून इलेक्ट्रिशियन तुफैलला अटक

Delhi blast Case: दिल्ली लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणात तपास यंत्रणांनी आणखी एका संशयिताला ताब्यात घेतलंय. जम्मू आणि काश्मीरच्या विशेष तपास पथकाने (SIA) आणि विशेष ऑपरेशन्स ग्रुपने (SOG) पुलवामा येथील इलेक्ट्रिशियन तुफैल अहमदला औद्योगिक क्षेत्रातून ताब्यात घेतलंय.
Delhi blast Case:
SIA and SOG personnel escort Pulwama-based electrician Tufail Ahmed arrested in the Delhi blast case.saamtv
Published On
Summary
  • जम्मू-काश्मीरच्या SIA आणि विशेष ऑपरेशन्स ग्रुप (SOG) यांची संयुक्त कारवाई

  • पुललवामातील इलेक्ट्रिशियन तुफैल अहमदला तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे.

  • दिल्ली लाल किल्ला स्फोट तपासात मोठं यश

दिल्लीतील लाल किल्ला स्फोटाच्या तपासात आणखी एक महत्त्वाचा यश मिळाले आहे. जम्मू आणि काश्मीरच्या राज्य तपास संस्थेने (SIA) आणि विशेष ऑपरेशन्स ग्रुपने (SOG) पुलवामा येथील रहिवासी तुफैल अहमदला अटक केली आहे. तुफैल हा एक इलेक्ट्रिशियन असून तो एका औद्योगिक वसाहतीत काम करतो. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू आहे.

Delhi blast Case:
Factory Blast : 'मृत्यूची फॅक्टरी'! बॉयलरच्या स्फोटात १५ कामगारांचा मृत्यू, पाकिस्तान हादरले

बॉम्ब स्फोटाच्या मॉड्यूलमध्ये तुफैलची भूमिका पूर्वीच्या विचारापेक्षा मोठी असू शकते. अशी माहिती सुत्रांनी दिलीय. तुफैल कोणाच्या संपर्कात होता, त्याच्या कारवाया काय होत्या. दिल्ली बॉम्बस्फोटाच्या कटात त्याचे काय योगदान असू शकते याचा सखोल तपास यंत्रणेमार्फत केले जात आहेत. आता पोलीस आणि तपास संस्था तुफैलविरुद्ध सर्व पुरावे गोळा करत आहेत. दिल्ली बॉम्बस्फोट कटात सहभागी असलेल्या प्रत्येक मोठ्या आणि किरकोळ घटकाचा पर्दाफाश केला जात आहे.

Delhi blast Case:
Terror Attack: पाकिस्तान आखतोय भारताविरुद्ध कट; ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादी पुन्हा सक्रिय

येत्या काही दिवसांत पोलीस त्याच्या संपर्कांची, फोन रेकॉर्डची आणि कारवायांची अधिक सखोल चौकशी करणार आहे. यामुळे बॉम्बस्फोटामागील सत्य आणि त्यात सामील असलेल्या नेटवर्कचा उलगडा होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com