Railway Recruitment Saam Tv
naukri-job-news

Railway Recruitment: रेल्वेची सर्वात मोठी भरती! ६१८० पदे भरली जाणार; पात्रता अर्ज अर्जप्रक्रिया जाणून घ्या

RRB Technicial Recruitment 2025: रेल्वेने सर्वात मोठी भरती जाहीर केली आहे. ६१८० पदांसाठी ह भरती करण्यात येणार आहे. टेक्निशियन पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

Siddhi Hande

रेल्वेत सरकारी नोकरी करण्याचे लाखो तरुणांचे स्वप्न असते. जर तुम्हालाही रेल्वेत नोकरी करायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. रेल्वेत टेक्निशियन पदासाठी भरती सुरु आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने भरती जाहीर केली आहे. टेक्निशियन पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे.

रेल्वे भरती बोर्डाने या नोकरीबाबत अधिसूचना जाहीर केली आहे. टेक्निशियन ग्रेड १ आणि ग्रेड ३ पदांसाठी ही भरती होणार आहे. ६१८० रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

अर्ज कधीपासून करावा? (Application Date And Process)

रेल्वेमधील टेक्निशियन पदासाठी अर्जप्रक्रिया २८ जूनपासून सुरु होणार आहे. याबाबत अधिसूचनेत माहिती दिली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जुलै २०२५ आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही rrbapply.gov.in या वेबसाइटवर जाऊन फॉर्म भरु शकणार आहात.

पात्रता (Education Qualification)

RRB टेक्निशियन पदासाठी ग्रेड १ आणि ग्रेड ३ पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत आयटीआयआय/संबंधित क्षेत्रात बीएससी / बीई / बीटेक / ३ वर्षांचा पॉलिटेक्निक डिप्लोमा केलेला असावा. जर तुमच्याकडे ही शैक्षणिक पात्रता असेल तरच अर्ज करा.

वयोमर्यादा (RRB Recruitment Eligibility)

या नोकरीसाठी ग्रेड १ पदासाठी १८ ते ३३ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. ग्रेड ३ पदांसाठी १८ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी ६१८० जागांवर भरती केली जाणार आहे. यातील टेक्निशियन ग्रेड ३ पदांसाठी ६००० जागा तर ग्रेड १ पदासाठी १८० जागा राखीव आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT