Manasvi Choudhary
चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी महागड्या क्रीम्सपेक्षा नियमित त्वचेची काळजी घेणे फायद्याचे आहे.
घरच्या घरी तुम्ही काही सोपे उपाय केल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येईल आणि चेहरा उजळेल.
बेसन, दही आणि चिमूटभर हळद एकत्र करून पेस्ट बनवा. हा पॅक चेहऱ्याला लावून १५-२० मिनिटे सुकू द्या. नंतर कोमट पाण्याने हलक्या हाताने चोळून चेहरा धुवा.
तांदळाच्या पिठात कच्चे दूध घालून चेहऱ्यावर हलक्या हाताने स्क्रब करा यामुळे ब्लॅकहेड्स निघून जातात आणि चेहऱ्यावर लगेच चमक येते.
कोरफडीचा गर आणि गुलाब पाणी एकत्र करून चेहऱ्यावर मसाज करा यामुळे चेहऱ्यावरील जळजळ कमी होते आणि त्वचा सॉफ्ट राहते.
दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी प्या. पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते, ज्यामुळे त्वचा आतून चमकते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.