ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पार्लर मध्ये थ्रेडिंग वापरुन अप्पर लिप्सवरील केस काढून टाकले जातात. थ्रेडिंग असो किंवा व्हॅक्सिंग, दोन्हीही अप्पर लिप्स भागावरील केस काढताना खूप वेदना होतात.
जर तुम्हाला अप्पर लिप्सवरील केस काढताना वेदना होऊ नयेत असे वाटत असेल तर तुम्ही ते घरी काढू शकता.
अप्पर लिप्सवरील केस काढण्यासाठी काही जुने घरगुती उपाय आहेत. ते जाणून घ्या
बेसन हे क्लिंजिंग एजंट म्हणून ओळखले जाते. ते त्वेचेचा रंग उजळवते आणि केस काढून टाकण्यास मदत करते.
बेसन आणि दूध मिक्स करुन पेस्ट बनवून घ्या. तयार केलेल्या पेस्टला अप्पर लिप्सवरील केसांवर लावा.
केसांवर लावलेली पेस्ट हलकी सुकल्यानंतर हातानी स्क्रब करुन घ्या. असे केल्यास ओठांवर असलेले केस निघण्यास मदत होईल.
मध हे स्किनसाठी अत्यंत फायदेशीर गोष्ट आहे. याने वॅक्स देखील केले जाते. आता मधाच्या मदतीने अप्पर लिप्स केस देखील करु शकता.
मध आणि बारीक साखर मिसळून पेस्ट तयार करा आणि ती तुमच्या ओठांच्यावर लावा.
पेस्ट सुकल्यानंतर हातानी स्क्रब करा. असे केल्यास अप्पर लिप्सवरील केस काढण्यास मदत होते.