ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सगळ्यांनाच वाटते की, परफेक्ट मेकअप करता यावा आणि चेहरा छान दिसावा. मेकअप चांगला करणे ही एक मोठी जबाबदारी आहे.
मेकअप प्रोडक्ट्सचा योग्यरित्या वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. जर मेकअप ओव्हर झाला तर पूर्ण लूक खराब दिसू लागतो.
मेकअप प्रोडक्ट्समध्ये हायलाईटर एक महत्त्वाची भूमिका बजावतो. हायलाईटर लावल्यास चेहऱ्यावरील लूक उजळलेला दिसतो.
पण हायलाईटर लावताना लोक नेहमीच चुका करतात, त्याने मेकअप खराब दिसू लागतो. जाणून घ्या
बहुतेक लोकांना असे वाटते की हायलाईटरचा विशिष्ट त्वचेचा रंग नसतो. हे चुकीचे आहे. प्रत्येक त्वचेच्या रंगाचा एक वेगळा हायलाईटर असतो.
तुमच्या चेहऱ्याच्या फिचर्सनुसार हायलाईटर लावा. काही लोक त्यांच्या संपूर्ण चेहऱ्यावर हायलाईटर लावतात, पण तसे करू नका.
हायलाईटर जर लावता येत नसेल तर, त्याला लूज पावडरमध्ये मिक्स करा आणि लावा. असे केल्यास चेहऱ्यावर शाईन येईल.
हायलाईटर नेहमी कमी प्रमाणात लावावे. जास्त हायलाईटर लावल्याने ते जास्त चमकले जाते आणि ते खराब दिसते.
हायलाईटरला देखील ब्लेंड करण्याची गरज असते. हायलाईटर जर नीट ब्लेंड नाही केले तर त्याचे पॅच दिसू लागतात.