ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हामुळे मोठ्या प्रमाणात टॅनिंगची समस्या निर्माण होते. यापासून वाचण्यासाठी लोक अनेक क्रीम आणि महागड्या प्रोडक्टसचा वापर करतात.
चेहऱ्यावर अति प्रमाणात टॅनिंग झाल्याने चेहरा कुरुप दिसतो. कपाळावर आणि मानेवर झालेली टॅनिंग ही स्पष्टपणे दिसून येते.
टॅनिंग दूर करण्यासाठी टोमॅटोचा वापर करता येतो. टोमॅटोमध्ये लायकोपीन आणि जीवनसत्त्वे असतात, जे टॅनिंग दूर करण्यास मदत करतात.
टोमॅटोचा फेसपॅक बनवणे एकदम सोपे आहे. कसा बनवायचा आणि कसे लावावे ता जाणून घ्या.
टोमॅटो चांगले मॅश करुन त्याचा रस काढून घ्या. त्यात मध आणि बेसन घालून घट्ट पेस्ट बनवून घ्या.
तयार केलेला फेसपॅक तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि २० ते २५ मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या. फेसपॅक सुकल्यानंतर चेहरा पाण्याने धुवून घ्या. हा फेसपॅक आठवड्यातून तुम्ही १ ते २ वेळा लावू शकता.
या फेसपॅकने तुमची त्वचा चमकदार दिसेल आणि चेहऱ्यावरील टॅनिंग पूर्णपणे निघून जाण्यास मदत होईल.
हा फेस पॅक त्वचेतील छिद्रे मोकळी करेल आणि त्वचेला हायड्रेट करेल, तसेच त्वचेच्या इतर समस्याही दूर करण्यास मदत करेल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.