Railway Recruitment Canva
naukri-job-news

Railway Jobs: १२वी पास ते पदवीधर तरुणांसाठी नोकरीची संधी, रेल्वेत भरती सुरु, अर्ज कसा करावा?

Railway Recruitment 2025: रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेत मिनिस्ट्रियल आणि आयसोलेटेडअंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रेल्वेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेत मिनिस्ट्रियल आणि आयसोलेटेडअंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ७ जानेवारी म्हणजेच आजपासून सुरु झाली आहे. रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०२५ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

मिनिस्ट्रियल आणि आयसोलेटेडअंतर्गत ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी १२ वी ते पदवीधर तरुणांनी अर्ज करावेत. टीचिंग पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने बीएड/ डीएलएड / टीईटी पास केलेले असावे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. (Railway Recruitment)

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ४८ असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.पीजीटी शिक्षक, टीजीटी शिक्षक, वैज्ञानिक पर्यवेक्षक, सरकारी वकील, ज्युनिअर ट्रान्सलेटर,लायब्रेरियन, संगीत शिक्षिका, सहाय्यक शिक्षक, प्राथमिक रेल्वे शिक्षक या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. (Railway Recruitment 2025)

रेल्वेतील या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना २५० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. रेल्वेत नोकरी करुन करिअरची सुरुवात करण्याची ही उत्तम संधी आहे. रेल्वेतील या नोकरीत तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतील. त्यामुळे पुढे भविष्यात तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीच्या संधीदेखील उपलब्ध होतील. त्यामुळे जर तुम्ही १२वी पास असाल तर या नोकरीसाठी अर्ज करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

SCROLL FOR NEXT