Railway Recruitment Saam Tv
naukri-job-news

Railway Recruitment: १०वी पास तरुणांसाठी रेल्वेत नोकरीची संधी, १०१० पदांसाठी भरती, वाचा सविस्तर

Railway ICF Apprentice Recruitment: रेल्वेमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. रेल्वेत सध्या अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १०१० पदांसाठी ही भरती होणार आहे.

Siddhi Hande

रेल्वेत सरकारी नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. त्यामुळे जर तुम्हालाही सरकारी नोकरी करायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. इंडियन रेल्वेने १० वी पास तरुणांसाठी अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर केली आहे. रेल्वे ICF अप्रेंटिस भरतीसाठी अर्जप्रक्रियादेखील सुरु झाली आहे.

इंडियन रेल्वेच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये ही भरती केली जाणार आहे. तब्बल १०१० अप्रेंटिस पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही pb.icf.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

रेल्वे ICF अप्रेंटिस भरतीसाठी अर्जप्रक्रिया १२ जुलैपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑगस्ट २०२५ आहे. या भरती मोहिमेत कारपेंटर, इलेक्ट्रिशियन, फिटर, मशीनिस्ट, पेंटर, वेल्डर, मेडिकल लॅब टेक्निशियन अशा पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

पात्रता (Eligibility)

रेल्वेमधील अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने दहावी आणि सायन्स स्ट्रीममधून १२वी पास असणे गरजेचे आहे. तसेच ITI संबंधित ट्रेडमध्ये ITI सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे.

या नोकरीसाठी १५ ते २२ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन याबाबत माहिती मिळवा.

स्टायपेंड

या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ट्रेनिंगच्या काळात स्टायपेंड दिली जाईल. १०वी पास तरुणांनी ६००० रुपये प्रति महिना स्टायपेंड मिळणार आहे. तर १२वी पास आणि आयटीआय सर्टिफिकेट प्राप्त उमेदवारांना ७००० रुपये मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : डाएट, व्यायाम करूनही वजन कमी होत नाही? 'या' चुका आहेत कारणीभूत

Maharashtra News Live Update: नागपुरात उद्या शांतता मार्च, सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ सिजेपी देशभरात रस्त्यावर उतरणार

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! वऱ्हाडाच्या बसची कंटेनरला धडक; १० ते १२ प्रवासी गंभीर, पाहा VIDEO

Ramesh Mhatre : मोठी बातमी! नगरसेवक रमेश म्हात्रेंना कोर्टाचा दणका, शरण येण्याचे आदेश

High blood pressure: हाय बीपीचा त्रास एका रात्रीत होत नाही; शरीरात दिसतं हे 1 सायलेंट लक्षण

SCROLL FOR NEXT