Mumbai Rain: मुंबई- ठाणे, नवी मुंबईत तुफान पाऊस, सखल भागात साचले पाणी; मध्य-हार्बर रेल्वे अर्धातास उशिराने

Heavy Rainfall In Mumbai: मुंबईसह ठाणे, नवी मुंबईमध्ये तुफान पाऊस पडत आहे. या पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच तारंबळ उडाली.
Mumbai Rain: मुंबई- ठाणे, नवी मुंबईत तुफान पाऊस, सखल भागात साचले पाणी; मध्य-हार्बर रेल्वे अर्धातास उशिराने
Mumbai RainSaam Tv
Published On

मु्ंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरूवात झाली. मुंबई शहर आणि उपनगरात सगळीकडेच जोरदार पाऊस पडत आहे. या पावसाचा परिणाम रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तर मध्य आणि हार्बर रेल्वेसेवा उशिराने सुरू आहेत. तर विमानसेवेवर देखील परिणाम झाला आहे. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची तारंबळ उडाली.

मुंबई शहर आणि पूर्व उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. दादर, माटुंगा, सायन, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, नाहूर, भांडूपमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. तर ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूरमध्ये देखील तुफान पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. नवी मुंबईमध्ये देखील तुफान पाऊस पडत आहे. सायन -पनवेल महामार्गावर पाणीच पाणी झाले आहे. खारघर, बेलापूर, वाशी, नेरूळ, उरणमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे.

आज मुंबईला हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसंच, ठाणे, रायगड, पालघरसाठी देखील येलो अलर्ट देण्यात आला आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन पालिका प्रशासनाकडून केले जात आहे. पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला. अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली आणि मालाड परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

Mumbai Rain: मुंबई- ठाणे, नवी मुंबईत तुफान पाऊस, सखल भागात साचले पाणी; मध्य-हार्बर रेल्वे अर्धातास उशिराने
Maharashtra Rain: राज्यात पुढचे ४ दिवस महत्वाचे, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात धो-धो; कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट?

अंधेरी सबवेत तीन फुटापर्यंत पाणी साचले आहे. त्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. अंधेरी पोलिस, सहार आणि डी एन नगर वाहतूक पोलिसांकडून अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून पाणी पंपद्वारे उपसण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. नागरिकांनी अंधेरी पूर्व पश्चिमेला जाण्यासाठी गोखले पूलाचा वापर करावा अशा सूचना वाहतूक पोलिसांनी दिल्या आहेत.

Mumbai Rain: मुंबई- ठाणे, नवी मुंबईत तुफान पाऊस, सखल भागात साचले पाणी; मध्य-हार्बर रेल्वे अर्धातास उशिराने
Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस, अंधेरी सब-वे पाण्याखाली; पाहा VIDEO

गेल्या काही तासांपासून पडणाऱ्या मुसळधार पावाामुळे रस्ते वाहतुकीसोबत रेल्वे वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे उशिराने धावत आहे. मध्य रेल्वे अर्धातास उशिराने तर हार्बर रेल्वे १५ ते २० मिनिटं उशिराने धावत आहे. तर मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत. तर दुसरीकडे या पावसामुळे विमान सेवेवर देखील परिणाम झाला आहे.

Mumbai Rain: मुंबई- ठाणे, नवी मुंबईत तुफान पाऊस, सखल भागात साचले पाणी; मध्य-हार्बर रेल्वे अर्धातास उशिराने
Rajsthan Rain : राजस्थानात पावसाचा कहर! मुसळधार पावसामुळे पूर; दोन जण गेले वाहून | VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com