Railway Recruitment Saam tv
naukri-job-news

Railway Recruitment: खुशखबर! रेल्वेत नोकरीची संधी; ११४९ रिक्त जागांवर भरती; आजच करा अर्ज

Railway Recruitment 2025: रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ईस्ट रेल्वेत अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

रेल्वेत नोकरीची संधी

ईस्ट रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु

अर्जप्रक्रिया काय आहे?

रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रेल्वे भरती बोर्डाने ईस्ट रेल्वेमध्ये भरती जाहीर केली आहे. रेल्वेने अप्रेंटिसशिप पदांसाठी भरती जाही केली आहे. या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

रेल्वेत अप्रेंटिस पदावर काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला ट्रेनिंगदेखील दिले जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जर फ्रेशर्स असाल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

ईस्ट सेंट्रल रेल्वेतील अप्रेंटिसशिप पदासाठी ११४९ जागांवर भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत आयटीआयमध्येही पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे होणार आहे.

अप्रेंटिस पदासाठी १५ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.या नोकरीसाठी अर्ज करताना तुमच्याकडे आयटीआय सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे. या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरायचे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

अर्ज कसा करावा?

या नोकरीसाठी www.ecr.indianrailways.gov.in या वेबसाइटवर जावे.

यानंतर ऑनलाइन अॅप्लिकेशनवर क्लिक करा.

यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेस करा. त्यानंतर कागदपत्रे अपलोड करा.

त्यानंतर फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट आउट तुमच्याजवळ ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज ठाकरे उद्या सोलापूर दौऱ्यावर, पूरपरिस्थितीची पाहणी करणार

Navapur Police : भाजीपाला वाहतुकीच्या नावाखाली दारू तस्करी; नवापूर पोलिसांच्या कारवाईत ५ लाखांची दारू जप्त

OTT Releases: विकेंड होणार धमाकेदार, एक-दोन नाही तर तब्बल १३ वेब सिरीज आणि चित्रपट होणार प्रदर्शित

Bullet Train: गुड न्यूज! बुलेट ट्रेन नवी मुंबई एअरपोर्टला जोडणार? प्रवास आणखी सुसाट आणि आरामदायी होणार

Rajgira Puri Recipe: नवरात्रीला उपवासासाठी बनवा खास राजगिऱ्याची पुरी, रेसिपी नोट करा

SCROLL FOR NEXT