Prasar Bharati Recruitment saam tv
naukri-job-news

Prasar Bharati Recruitment: प्रसार भारतीमध्ये नोकरीची संधी; पगार ३ लाख रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Prasar Bharati Recruitment 2025: प्रसार भारतीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. प्रसार भारतीमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. प्रसार भारतीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.प्रसार भारती ही भारत सरकारसाठी काम करते. प्रसार भारतीमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अधिसूचना ३ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर तुम्हाला १५ दिवसात अर्ज करायचे आहेत.

भरती

प्रसार भारतीमध्ये प्रिंसिपल अॅडवायजर/ अॅडवायजर कंटेट ऑपरेशन, पीबी अशा विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीबाबतची अधिसूचना तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन वाचा.

जर तुम्हाला प्रसार भारतीमध्ये नोकरी करायची असेल तर prasarbharati.gov.in या वेबसाइटवर जाऊन फॉर्म भरा. प्रसार भारती हे भारताचे सर्वात मोठी सार्वजनिक प्रसारण संस्था आहे. ह संस्था दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओद्वारे कार्यरत आहे.

प्रसार भारतीमध्ये प्रमुख सल्लागार-कंटेट ऑपरेशन्स, पीबी या पदासाठी भरती जाहीर केली आहे. नवी दिल्ली येथे नोकरीचे ठिकाण आहे. या नोकरीसाठी तुम्हाला महिन्याला २.५ ते ३ लाख रुपये पगार मिळणार आहे.

पात्रता

प्रसार भारतीमध्ये या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कंटेट डेव्हलपमेंट /मास कम्युनिकेशन/ अॅडव्हटायजिंग / फिल्म मेकिंग पदवी / पीएचडी केलेली असावी. याचसोबत एमबीए / पीजी डिप्लोमा केलेले उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. उमेदवाराला इलेक्ट्रॉनिक मिडिया / डिजिटल ऑपरेशन्समध्ये किमान १५ वर्षांचा अनुभव असायला हवा.

या नोकरीसाठी तुम्हाला https://avedan.prasarbharati.org या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी तुमची निवड झाली तर तुम्हाला ई मेलद्वारे कळवले जाईल. चांगल्या सरकारी संस्थेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vijay Wadettiwar: हे पॅकेज शेतकऱ्यांना पुन्हा कर्जाच्या खाईत लोटणारं - विजय वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर आरोप|VIDEO

Arvind Sawant : राज ठाकरे यांना सोबत घेण्याचा उबाठाचा निर्णय पक्का; हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावर अरविंद सावंत यांचे वक्तव्य

Maharashtra Politics: शरद पवारांना मोठा धक्का! विश्वासू नेता सोडणार साथ

Blouse Sleeves Design: महिलांनो, दिवाळीसाठी खास नवीन स्टाईलचे ब्लाऊज शिवा, तुमचा लूक दिसेल सुंदर

Maharashtra Live News Update : धुळ्यात पुन्हा पावसाची जोरदार बॅटिंग सुरु

SCROLL FOR NEXT