DRDO Recruitment: फ्रेशर्स आहात? DRDO मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा?

DRDO Recruitment 2025: नुकतेच शिक्षण पूर्ण झालंय अन् नोकरी शोधताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी. डीआरडीओमध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. अप्रेंटिस पदासाठी ही भरती केली जाणार आहे.
DRDO Recruitment
DRDO RecruitmentSaam Tv
Published On
Summary

तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

डीआरडीओमध्ये नवीन भरती जाहीर

५० अप्रेंटिस पदासाठी निघाली भरती

पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

नुकतेच शिक्षण पूर्ण झालंय अन् नोकरी शोधताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी. डीआरडीओ या सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजे DRDO ने भरती जाहीर केले आहे. अप्रेंटिस पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

DRDO Recruitment
Canara Bank Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार नोकरी; कॅनरा बँकेत भरती सुरु; अर्ज कसा करावा?

अर्ज कसा करावा? (DRDO Recruitment Application Process)

डीआरडीओमध्ये टेक्निकल आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहे. तुम्ही training.pxe@gov.in या ई मेलवर जाऊन अर्ज करायचा आहे. त्याआधी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन सर्व माहिती वाचा. त्यानंतरच अर्ज करा. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑक्टोबर २०२५ आहे.

डीआरडीओमध्ये (DRDO) एकूण ५० पदांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी १० जागा राखीव आहेत. टेक्निकल अप्रेंटिस पदासाठी ४० जागा राखीव आहेत. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी बीई/बीटेक पदवी प्राप्त केलेली असावी. टेक्निकल अप्रेंटिस पदासाठी डिप्लोमा केलेले उमेदवारदेखील अर्ज करु शकतात.

स्टायपेंड (DRDO Apprenticeship Stipend)

डीआरडीओमधील या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना स्टायपेंड मिळणार आहे. ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी १२,३०० रुपये पगार मिळणार आहे तर टेक्निकल अप्रेंटिस पदासाठी १०,९०० रुपये स्टायपेंड मिळणार आहे.

DRDO Recruitment
Railway NTPC Recruitment: खुशखबर! रेल्वेत ८,८७५ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

निवडप्रक्रिया

डीआरडीओमधील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे. ट्रेनिंगदरम्यान उमेदवारांना स्टायपेंड दिले जाणार आहे. या नोकरीसाठीची अर्जप्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असणार आहे. तुम्हाला drdo.res.in या वेबसाइटवर सर्व माहिती मिळणार आहे. हा अर्ज भरताना तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे. यानंतर हा फॉर्म training.pxe@gov.in या ई मेलवर पाठवायचा आहे.

DRDO Recruitment
Pune IT Jobs : टाटांच्या कंपनीत नोकरकपात, पुण्यातील २५०० कर्मचाऱ्यांना राजीनामा द्यायला लावला, कुटुंबाच्या अडचणी वाढल्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com