Surabhi Jayashree Jagdish
उद्या दहावीचा निकाल लागणार आहे. यावेळी जर तुम्हाला पुढील करियर बाबत माहिती हवी असेल तर पुढे पाहा
सध्या दहावीनंतर विविध कोर्स केले जातात. मात्र याची माहिती विद्यार्थ्यांना जास्त नसते.
आम्ही तुम्हाला काही कोर्सेसची माहिती देणार आहोत. जे तुम्ही दहावीनंतर करू शकता.
विद्यार्थी दहावीनंतर डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करू शकतात. हा डिप्लोमा प्रोग्राम १ वर्षाचा असतो.
दहावीनंतर विद्यार्थी तीन वर्षांचा डिप्लोमा इन इंजीनियरिंग कोर्स देखील करू शकतात. हा कोर्स केल्यानंतर कॅम्पस प्लेसमेंटचीही शक्यता असते
सध्या डिजीटल मार्केटिंगच्या क्षेत्राला चांगली मागणी असून SEO, पे-पर-क्लिक जाहिरात, सोशल मीडिया मार्केटिंग आणि ई-मेल मार्केटिंग शिकता येतं.