PCMC Recruitment Saam Tv
naukri-job-news

PCMC Recruitment: १० वी पास उमेदवारांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; अशा पद्धतीने करा अर्ज

PCMC Recruitment 2024: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. १० वी पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकणार आहे. या नोकरीसाठी अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पिंपरी चिचवड महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत डेंग्यु, पर्यावरण व्यवस्थापनाकरीता रिक्त पदे आहेत. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. १० वी पास उत्तीर्ण उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकणार आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाद्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. १८ ते ४३ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. २ महिन्यांच्या कालावधीसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

ब्रिडींग चेकर्स या पदासाठी भरती करण्यात येणार आहे. ५६ रिक्त पदे भरण्यात येणार आहे. ३ जुलै ते ११ जुलैपर्यंत तुम्ही कधीही हा अर्ज वैद्यकीय विभाग, दुसरा मजला आवक-जावक कक्ष, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, भवन, पिंपरी-४११ ०१८ या पत्त्यावर पाठवू शकतात.

या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवाराने वयाचा पुरावा, पदवी प्रमाणपत्र, कामाच्या अनुभवाचा पुरावा, निवासी पुरावा, उमेदवाराचा फोटो या गोष्टी दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.www.pcmcindia.gov.in या वेबसाइटवर सर्व माहिती दिली आहे.

या नोकरीसाठी दिवसाच्या आधारे पगार दिला जाईल. दरदिवशी ४५० रुपये पगार म्हणजेच तुम्ही महिन्यातून २५ दिवस काम केले तर तुम्हाला ११,२५० रुपये मानधन मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT